जाणून घ्या, खुद्द गँगस्टर गोल्डी ब्रारने तीन वर्षांनंतर काय केला खुलासा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली -Sidhu Moosewala पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालाची मे २०२२ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. गँगस्टर गोल्डी ब्रार आणि त्याच्या टोळीवर ही हत्या केल्याचा आरोप होता. मूसेवाला पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावाजवळ कारमधून जात होता आणि त्याचवेळी त्याच्या कारवर १०० हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्याला ३ वर्षे उलटल्यानंतर आता गोल्डी ब्रारने हल्ल्यामागील गुपित उघड केले आणि सांगितले की त्याने मूसेवालाची हत्या का केली?Sidhu Moosewala
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत, हत्येतील मुख्य आरोपी सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रारने सांगितले की त्याने आणि त्याच्या साथीदारांनी ही हत्या कशी केली आणि मूसेवालाची हत्या का करण्यात आली. ब्रारने सांगितले की, ‘त्याच्या अहंकारामुळे त्याने (मूसेवालाने) अशा चुका केल्या होत्या ज्या माफ करता येत नव्हत्या. त्याला मारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. त्याला त्याच्या कृत्यांचे परिणाम भोगावे लागले. एकतर तो राहिला असता नाहीतर आम्ही. बस्स एवढच आहे.’
गोल्डी ब्रारने आणखी काय सांगितले?
तो म्हणाला, “लॉरेन्स बिश्नोई आणि सिद्धू मूसेवाला एकमेकांच्या संपर्कात होते. मला माहित नाही की या दोघांची ओळख कोणी करून दिली आणि मी कधीही विचारले नाही पण हे दोघे बोलत असत. लॉरेन्सची प्रशंसा करण्यासाठी सिद्धू त्याला गुड मॉर्निंग आणि गुड नाईट मेसेज पाठवत असे.” गोल्डी ब्रारने दावा केला आहे की मूसेवालासोबतचा वाद पंजाबमधील कबड्डी स्पर्धेवरून सुरू झाला.
गोल्डी म्हणाला, “ते एक असं गाव आहे जिथून आमचे प्रतिस्पर्धी येतात आणि तो आमच्या प्रतिस्पर्ध्यांना प्रोत्साहन देत होता. तेव्हाच लॉरेन्स आणि इतर काही लोक त्याच्यावर रागावले. त्यांनी सिद्धू मूसेवालास धमकी दिली आणि सांगितले की ते त्याला सोडणार नाहीत.” बीबीसीच्या वृत्तानुसार, बिश्नोईचा सहाय्यक आणि मध्यस्थ विकी मिद्दुखेराच्या हस्तक्षेपाने तणाव कमी झाला परंतु ऑगस्ट २०२१ मध्ये मोहालीमध्ये मिद्दुखेराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
ब्रार म्हणाला, “सिद्धूची भूमिका सर्वांना माहिती होती, तपास पोलिसांनाही माहिती होती, पत्रकारांनाही माहिती होती. सिद्धू राजकारणी आणि सत्तेत असलेल्या लोकांशी संगनमत करत होता. तो आमच्या प्रतिस्पर्ध्यांना मदत करण्यासाठी राजकीय शक्ती, पैसा आणि त्याच्या संसाधनांचा वापर करत होता. त्याच्या कृत्याबद्दल त्याला शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा होती. त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. तो तुरुंगात जायला हवा होता पण कोणीही आमची विनंती ऐकली नाही. म्हणून आम्ही ती जबाबदारी स्वतःवर घेतली. जेव्हा काहीही शांतपणे ऐकू येत नाही तेव्हा गोळीचा आवाज ऐकू येतो.”
ब्रार म्हणाला, “कायदा, न्याय असे काहीही नाही. फक्त शक्तिशाली लोकांनाच न्याय मिळू शकतो, आमच्यासारख्या सामान्य लोकांना नाही. मी माझ्या भावासाठी जे करायचे होते ते केले. मला कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप नाही.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App