काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने उपेक्षित ठेवले, भाजपने “आपलेसे” केले; पटेलांच्या बाबतीत जे झाले, तेच नाईकांच्या बाबतीत घडले!!

Congress - NCP

नाशिक : काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने उपेक्षित ठेवले, त्यांना भाजपने आपलेसे केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबतीत जे घडले, तेच वसंतराव नाईक यांच्या बाबतीत झाले!!Congress – NCP ignored, BJP did “its own thing”; What happened to Patel, happened to Naik!!

काँग्रेसने नेहरू गांधी परिवाराचा अतिरिक्त उदोउदो करताना सरदार वल्लभभाई पटेल नेताजी सुभाष चंद्र बोस आणि अन्य काँग्रेस नेत्यांचे राजकीय आणि सामाजिक महत्त्वच नाकारले. भारताला फक्त पंडित नेहरू आणि गांधी परिवाराने स्वातंत्र्य दिल्याचा जयघोष केला, पण म्हणून वल्लभभाई पटेल आणि सुभाष चंद्र बोस यांचे कर्तृत्व झाकून राहिले नाही. भाजपने त्यांना आपलेसे करून त्यांचे सगळे कर्तृत्व जगासमोर आणले.



जे देशपातळीवर घडले, तेच महाराष्ट्राच्या बाबतीत आज समोर आले. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचा अतिरिक्त उदो उदो करताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांची उपेक्षा केली. महाराष्ट्रावर यशवंतराव चव्हाण यांनी फार मोठे “संस्कार” केले, असे मोठ-मोठे दावे शरद पवार, सुप्रिया सुळे अजित पवार कायमच करत राहिले. जणू काही फक्त यशवंतराव चव्हाण यांनीच संस्कार केले आणि बाकीच्यांनी काही केले नाही, असा आभास राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीने निर्माण करायचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या काँग्रेसचे सगळे नेते फक्त नेहरू गांधी परिवाराच्या भजनी लागले, त्यांनी तर यशवंतरावांची देखील उपेक्षा केली.

वास्तविक वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्रात कृषी क्रांतीची बीजे रोवली गेली. 1972 च्या दुष्काळाच्या काळात महाराष्ट्राने रोजगार हमी योजना निर्माण करून सगळ्या देशाला एक वेगळी दिशा दिली, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वसंतराव नाईक यांच्या या कर्तृत्वाची फार कमी वेळा दखल घेतली. त्यांच्या जयंती – पुण्यतिथीला त्यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करणे एवढ्या पुरते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वसंतराव नाईक यांना मर्यादित ठेवले होते.

पण महाराष्ट्रात भाजपने वसंतराव नाईक आणि शंकरराव चव्हाण या दोन मोठ्या नेत्यांना आपलेसे करून घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नांदेडमध्ये वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी आयोजित केला. अशोक चव्हाण हे देखील असे एक नेते आहेत, ज्यांची काँग्रेसमध्ये उपेक्षा झाल्याने त्यांनी भाजपचा रस्ता धरला. नांदेड मध्ये कार्यक्रम आयोजित करून वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करवून घेतले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी वसंतराव नाईक या ओबीसी नेत्याची उपेक्षा केली तरी भाजपने त्यांना आपलेसे करून आपली ओबीसी मतपेढी अधिक मजबूत करून घेतली.

नांदेड मधल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आवर्जून उपस्थित राहिले होते.

Congress – NCP ignored, BJP did “its own thing”; What happened to Patel, happened to Naik!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात