खटल्यांमधून आरोपी निर्दोष सुटण्यामागच्या कारणांचा अभ्यास करून, त्यातील त्रृटी दूर कराव्यात, असंही सांगितले.
विशेष प्रतिनिधी
सांगली : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे, ‘सांगली जिल्हा पोलीस’ आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सर्वतोपरी कामगिरी करावी. त्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून ‘कन्व्हिक्शन रेट’ वाढवावा, असे निर्देश दिले.Devendra Fadnavis
तसेच खटल्यांमधून आरोपी निर्दोष सुटण्यामागच्या कारणांचा अभ्यास करून, त्यातील त्रृटी दूर कराव्यात. आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या पोलीस ठाण्यांचा आढावा घेत, यातील त्रृटी दूर कराव्यात. त्यासाठी सरकारी वकिलांची बैठक घ्यावी. ई-समन्सची नियमित प्रभावी अंमलबजावणी करावी. यामुळे वेळ व पैसा वाचतो. सर्व उपाय करून कन्व्हिक्शन रेटचे प्रमाण वाढले पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.
मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत केलेला माल परत देण्याचे प्रमाण वाढवावे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना औद्योगिक क्षेत्रातील बंद रासायनिक कंपन्यांचे सर्वेक्षण करून तपासणी करावी. यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित पोलीस ठाण्यांना सूचित करावे.”
बेपत्ता महिलांसंदर्भातील गुन्ह्यांचा पूर्ण तपास आणि कार्यवाही होईपर्यंत पाठपुरावा करावा. यासंदर्भात दाखल गुन्हे, त्यातील किती महिला परत आल्या याचे पोलीस ठाणे निहाय ट्रॅकिंग करावे. यासंदर्भात विशेष मोहीम राबवावी. मोटार वाहन कायद्याखालील केसेससाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करा, असे मुख्यमंत्र्यांनी संबंधीतांना सूचित केले.
दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्याचे व गुन्हे ‘कन्व्हिक्शन रेट’चे प्रमाण वाढवावे, असे सूचित करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन फौजदारी कायद्यांच्या माध्यमातून दोषारोपपत्र दाखल होण्याची गती वाढवावी. 60 ते 90 दिवसात दोषारोपपत्र दाखल करावेत तसेच आरोपीच्या गैरहजेरीमध्येही खटले चालवावेत. नवीन फौजदारी कायद्यामुळे पुरावे स्वीकारार्हतेची कक्षा वाढल्याने त्याचा फायदा घ्यावा. झिरो एफआयआरचे नियमित एफआयआरमध्ये रूपांतरण करावे, असेही ते म्हणाले.
कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. यावर्षी 117 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरमधील 2019च्या महापुराचा धोका लक्षात ठेवून, त्याप्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, लोकांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App