विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असली लोकं माझ्या पक्षात नकोत, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्याविषयी बोलताना अजित पवारांनी भाष्य केले आहे. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.Ajit Pawar
अजित पवार म्हणाले, माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असली लोकं माझ्या पक्षात नकोत. बहुतेक त्यांचे लव्ह मॅरेज आहे. माझा तिथे काही संबंध नाही. मी फक्त लग्नाला गेलो. जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पथक नेमली आहेत. माणुसकी म्हणून जबाबदारी म्हणून जे काही करायचे आहे ते आम्ही केले आहे. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत.
…तर अजित पवारला फासावर लटकवा
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, माझा दुरान्वये संबंध नाही, फक्त लग्नाला गेलो म्हणून माझी बदनामी केली गेली. या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. दोघे फरार आहेत. शोधासाठी आणखी पथके वाढवायला सांगितली आहेत. तसेच जर अजित पवार दोषी असतील तर अजित पवारला फासावर लटकवा. माझा त्यात काय संबंध असेल तर कारवाई करा. उगाच बदनामी केली जाते. मला सांगितले गाडीची चावी द्यायला सांगितली. मी देता ना पण विचारले. स्वखुशीने देत आहात की जबरदस्तीने देत आहात असेही विचारले होते. मग माझी का बदनामी करता. गुन्हा नोंद झाला आहे. सीपींना सांगितले कारवाई झाली पाहीजे.
लग्नाला गेलो म्हणून आम्ही सांगतो का सुनेशी असे वागा?
अजित पवार म्हणाले, तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलावता.मी शक्य असेल तर येण्याचा प्रयत्न करतो. मी एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्याच्या सुनेने वेडेवाकडे केले, तर त्याला अजित पवार काय संबंध आहे. अजित पवारांनी सांगितले का असे कर म्हणून मला तर कळतच नाही. मी घटना घडल्याची माहिती कळल्यावर पिंपरीच्या सीपींना फोन केला आणि म्हटले कोणी का असेना कारवाई करा. मला कळताच पोलिसांना सांगितले कारवाई करा. ज्या मुलीने आत्महत्या केली, तिचा नवरा, सासू, नणंद आतमध्ये आहे. सगळे अटकेत आहेत. सासरा पळून गेला. तो पण सापडेल, पळून जातो कुठे? यामध्ये अजित पवारांचा काय संबंध? प्रेमापोटी लोक बोलावतात तिथे जावे लागते, नाही गेले तर माणसे रुसतात, लग्नाला गेलो म्हणून आम्ही सांगतो का सुनेशी असे वागा म्हणून, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला पाहिजे.
अंबादास दानवेंची अजित पवारांवर टीका
शिवसेना शिंदे गटाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. फडतूस दादा असे म्हणत दानवे यांनी पवारांवर टीका केली आहे. हुंडा या अनिष्ट प्रथेचे उदात्तीकरण करणारा उपमुख्यमंत्री आपण लाडका भाऊ म्हणून घेतल्यावर, दुसरे काय होणार? हुंडाबळी, असे म्हणत दानवे यांनी टीका केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App