विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister Fadnavis भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअपशक्ती बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. चीननंतर भारतात सर्वाधिक स्टार्टअप्स उदयाला आलेत. त्यामुळे भविष्यात भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअप शक्ती बनेल, असे ते म्हणालेत.Chief Minister Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे सीएसआयआर आणि तीन प्रमुख वैज्ञानिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्टार्टअप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे कॉन्क्लेव्ह मुंबईत आयोजित केल्याबद्दल केंद्र व संबंधित संस्थांचे आभार मानले. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इकोसिस्टिमपैकी एक आहे. चीननंतर भारतात सर्वाधिक स्टार्टअप्स उदयाला आले असून, भविष्यात भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअप शक्ती बनेल, असे ते म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महाराष्ट्र स्टार्टअप्सच्या बाबतीत देशातील क्रमांक एकचे राज्य असल्याचा दावा केला. ते म्हणाले, महाराष्ट्र स्टार्टअप्सच्या बाबतीत संपूर्ण देशात क्रमांक एकवर आहे. 2025 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात 26 हजार 686 स्टार्टअप्स आहेत. जे देशातील एकूण स्टार्टअप्सच्या 24 टक्के आहेत. गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटल फंड्सच्या उपलब्धतेमुळे मुंबई स्टार्टअप्ससाठी सर्वात योग्य ठिकाण बनत आहे.
राज्यात ‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’, ‘मुंबई फिनटेक हब’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ तयार केल्या आहेत. त्यामुळे मुंबई हे आर्थिक आणि तांत्रिक इनोव्हेशनचे केंद्र बनले आहे. फिनटेक, ई-कॉमर्स, हेल्थटेक, एडटेक आणि डीप टेक स्टार्टअप्स झपाट्याने विकसित होत असून देशातील सर्वाधिक म्हणजे 27 युनिकॉर्न कंपन्या महाराष्ट्रात आहेत.
आधुनिक ‘इनोव्हेशन सिटी’चे बांधकाम सुरू
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई हे देशातील सर्वाधिक निधी प्राप्त करणारे स्टार्टअप हब आहे. या वर्षी स्टार्टअप्सनी एकूण 3.7 बिलियन डॉलर्सचा निधी प्राप्त केला. हा निधी गेल्या वर्षाच्या तुलनेत 154 टक्के अधिक आहे. पुणे हे माहिती व तंत्रज्ञान, वाहन उद्योग आणि बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. आता नवी मुंबईत 300 एकरावर देशातील सर्वात आधुनिक ‘इनोव्हेशन सिटी’चे बांधकाम सुरू आहे. जेथे विज्ञान, तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, डेटा सायन्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील स्टार्टअप्स विकसीत होतील.
भारत जगातील सर्वोत्तम स्टार्टअप केंद्र बनू शकते
भारतात सध्या दीड लाखांहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत असून भविष्यात भारत हे जगातील सर्वोत्तम स्टार्टअप केंद्र बनू शकते. सीएसआयआर- एनसीएल, सीएसआयआर निरी आणि सीएसआयआर एनआयओ या संस्थांनी या कॉनक्लेव्हचे आयोजन केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवीन संशोधन पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. भारताला आत्मनिर्भर आणि जागतिक महासत्ता बनवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आपल्या भाषणाच्या सरुवातीला शिंदेंनी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना आदरांजलीही अर्पण केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App