वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या अटीवर प्रा. अली खान मेहमूदाबादला सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर!!

Ali Khan Mahmudabad

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : operation sindoor दरम्यान वादग्रस्त ट्विट करून देशाविरुद्ध भूमिका जाहीर करणाऱ्या राज्यशास्त्राचा प्राध्यापक अली खान मेहबूदाबाद याला सुप्रीम कोर्टाने आज जामीन मंजूर केला. पण कुठल्याही वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

Operation sindoor चे प्रेस ब्रीफिंग करणाऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात अली खान मेहमूदाबाद यांनी वादग्रस्त ट्विट केले होते. Operation sindoor यशस्वी झाल्याचा केवळ देखावा करण्यासाठी सरकारने दोन महिलांना पुढे केले, असा आरोप अली खान मेहमूदाबाद याने या ट्विट मधून मधून केला होता. यानंतर हरियाणा पोलिसांनी त्याला अटक केली होती.

पोलिसांच्या या कारवाई विरुद्ध तो ज्या अशोका युनिव्हर्सिटी प्राध्यापक आहे, तिथल्या शिक्षकांनी सरकारविरुद्ध आकांडतांडव केले होते. सरकारने अविष्कार स्वातंत्र्याच्या विरोधात जाऊन अली खान मेहमूदाबाद याला अटक केली असा दावा केला होता.

मात्र सुप्रीम कोर्टाने आज अली खान मेहबूदाबाद याला जामीन मंजूर केला. त्याच्या सुटकेचे आदेश दिले पण त्याचवेळी ऑनलाइन किंवा ऑफलाईन कुठलेही वादग्रस्त व्याख्यान द्यायचे नाही. किंवा टिपणी करायची नाही, असे सक्त आदेशही दिले.

Supreme Court orders release of Ali Khan Mahmudabad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात