Rahul Gandhi : ऑपरेशन सिंदूरच्या लखलखीत विजयावर काँग्रेसची चिखलफेक; राहुल गांधींच्या विधानांनी पाकिस्तानला मिळाले हत्यार

Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली ; Rahul Gandhi भारताच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाच्या दृष्टीने निर्णायक ठरलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ ने पाकिस्तानला लज्जास्पद पराभवाची चव चाखवली. भारताने केवळ दहशतवाद्यांवर प्रहार केला नाही, तर जगाला स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कारवाई करतो, शब्दांवर नाही, कृतीवर विश्वास ठेवतो. मात्र, या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसने आपले क्षुद्र राजकारणाचे शस्त्र म्यान केलेले दिसत नाही.Rahul Gandhi

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा एक बनावट व्हिडीओ शेअर करत दावा केला की, ऑपरेशन सिंदूर सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानला माहिती देण्यात आली होती. त्यांनी भारतीय हवाई दलाने किती विमाने गमावली, यावरही प्रश्न उपस्थित केले.



मात्र, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने स्पष्ट केले की, हा व्हिडीओ बनावट आहे. संरक्षण विभागाने दिलेल्या टाइमलाइननुसार, ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरच पाकिस्तानला संदेश देण्यात आला होता, तोही लष्करावर नव्हे, दहशतवादी तळांवर कारवाई आहे, हे स्पष्ट करण्यासाठी हा संदेश दिला होता.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेऱा यांनी पत्रकार परिषदेत एक पाऊल पुढे जात दावा केला की, जयशंकर यांच्या विधानामुळे दहशतवादी पळून गेले असावेत. त्यांनी थेट विचारले, तुम्ही दहशतवाद्यांवर एवढा विश्वास ठेवता का की, माहिती दिल्यावर ते तिथेच थांबतील? याला गावात ‘मुखबिरी’ म्हणतात. हा गुन्हा आहे. विश्वासघात आहे. अझहर मसूद आणि हाफिज सईद वाचले यामागेही हेच सरकार असल्याचा आरोप केला. पहिल्यांदा कंधारमध्ये वाचवले, आता पुन्हा? ही फक्त चूक नाही, ही रणनीतीचा भाग आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

राहुल गांधींच्या आणि काँग्रेसच्या या विधानांचा पाकिस्तानी माध्यमांनी वापर करत ऑपरेशन सिंदूरला भारताचा पराभव ठरवण्याचा प्रयत्न केला. भारतात देशहिताविरुद्ध असलेली विधाने पाकिस्तानात प्रचाराची साधने बनतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

भारत सरकारने पाकिस्तानविरोधात जागतिक स्तरावर भारताची बाजू मांडण्यासाठी सात शिष्टमंडळे परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला. यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व शशी थरूर करत आहेत. काँग्रेसने माजी मंत्री आनंद शर्मा, गौरव गोगोई, नासिर हुसेन आणि अमरिंदर सिंग ब्रार यांची नावे सुचवली होती.सरकारने यातील फक्त आनंद शर्मा यांचे नाव स्वीकारले. उर्वरित नावे वगळून थरूर, मनीष तिवारी, सलमान खुर्शीद यांना निवडले.
यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत हे सरकारचे “स्वस्त राजकारण” असल्याचा आरोप केला.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले की, “ऑपरेशन सिंदूरवर राजकारण केले जात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सात वेळा म्हणाले की, त्यांच्यामुळे संघर्ष कमी झाला. तरीही मोदी गप्प का?” असा सवाल त्यांनी केला.

जेव्हा देशाच्या जवानांनी सीमारेषेवर विजय मिळवलेला असतो, तेव्हा राजकीय पक्षांनी देशहितात एकसंघ भूमिका घेणे आवश्यक असते. पण काँग्रेसने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, त्यांच्यासाठी सत्तेच्या राजकारणाची किंमत देशाच्या गौरवापेक्षा अधिक आहे.

Congress throws mud at Operation Sindoor’s stunning victory; Rahul Gandhi’s statements give Pakistan a weapon

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात