Jayant Narlikar प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन

Jayant Narlikar

वयाच्या ८६ व्या वर्षी घेतलाअखेरचा श्वास

विशेष प्रतिनिधी

पुणे : प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज(मंगळवार) पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला होता. भारताचं आजचं खगोलशास्त्राचं जे संशोधन आणि प्रगती आहे त्यामध्ये जयंत नारळीकर यांचा महत्त्वाचा वाटा होता.

जयंत नारळीकर यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले होते. नंतर पुढील शिक्षणासाठी ते केंब्रिज विद्यापिठात गेले होते. त्यानंतर ते भारतात परतले आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. 2021मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही राहिले होते‌.

जयंत नारळीकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय विज्ञानातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले डॉ. नारळीकर हे विश्वविज्ञानातील त्यांच्या अग्रगण्य योगदानासाठी, विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी आणि देशात प्रमुख संशोधन संस्था स्थापन करण्यासाठी प्रसिद्ध होते.

Renowned astronomer Jayant Narlikar passes away

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात