येत्या 5 वर्षात मुंबईचा चेहरामोहरा पूर्णतः बदललेला दिसेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘करिअर ट्रेनिंग प्रोग्राम’ अंतर्गत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय विदेश सेवेतील अधिकार्यांसमवेत (IFS) बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2013-14 तुकडीतील भारतीय विदेश सेवेतील 14 अधिकाऱ्यांशी संवाद साधला.Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संवादादरम्यान महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईच्या आगामी आर्थिक आणि शैक्षणिक विकास दृष्टिकोनाची सविस्तर मांडणी केली. चौथ्या मुंबईतील वाढवण बंदर हे जेएनपीटीपेक्षा तीनपट मोठे असून, भविष्यात ते जागतिक स्तरावरील पहिल्या 10 बंदरांमध्ये गणले जाईल. या बंदराच्या माध्यमातून पुढील 20 वर्षात एका नव्या अर्थव्यवस्थेचा उदय होईल आणि एकट्या मुंबईमध्ये सध्या 1.5 ट्रिलियन डॉलर्स इतकी अर्थव्यवस्था घडवण्याची क्षमता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या समग्र विकासासाठी विविध पायाभूत प्रकल्प राबवले जात असून, त्यात कोस्टल रोड, अटल सेतू आणि तिसऱ्या मुंबईचा समावेश आहे. तसेच, मुंबईत 200 एकर जागेवर एड्यु सिटी उभारली जाणार असून, यामध्ये देशातील 12 नामांकित विद्यापीठांचा समावेश असेल. सुमारे 1,00,000 विद्यार्थी येथे शिक्षण घेतील. याशिवाय 300 एकरमध्ये इनोव्हेशन सिटी आणि तब्बल 1000 एकरमध्ये नॉलेज सिटी उभारण्याचे नियोजन असून, त्यामुळे मुंबई तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर येईल आणि येत्या 5 वर्षात मुंबईचा चेहरामोहरा पूर्णतः बदललेला दिसेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विदेश सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत परराष्ट्र धोरणातील महाराष्ट्राचा सहभाग, आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणुकीच्या संधी, राज्यातील विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्प आणि विकसित भारताच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीबाबत विस्तृत विचारविनिमय झाला. यावेळी अप्पर मुख्य सचिव, सचिव व इतर अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App