Devendra Fadnavis : महाराष्ट्रामध्ये रेरा नोंदणीकृत प्रकल्पांची संख्या देशात सर्वाधिक – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

शहरे विकासाची ग्रोथ इंजिन असून देशाचा 65 टक्के जीडीपी शहरांत तयार होतो, असंही फडणवीस म्हणाले.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन हा नरेडकोचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. नरेडको संस्था विकासक, सरकार आणि ग्राहक अशा सर्वांच्या हिताचे रक्षण करण्याकरिता सातत्याने काम करत आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे पदग्रहण केलेल्या, जेन नेक्स्ट आणि वुमन्स विंग या सर्वांचे अभिनंदन केले.Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर, मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये, वेगवेगळ्या पॉलिसी इंटरव्हेन्शनमध्ये नरेडकोने चांगली भूमिका निभावली. रेरा कायदा महाराष्ट्रात सर्वात आधी लागू करण्यात आला व नंतर संपूर्ण देशाने त्याचे अनुकरण केले. या सर्व कालावधीमध्ये नरेडको व रियल इस्टेट क्षेत्रामधील अनेक संस्थांशी विस्तृत चर्चा केली, मंथन करण्यात आले. महाराष्ट्रात रेरामुळे रियल इस्टेट क्षेत्रामध्ये नवीन विश्वासार्हता तयार झाली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने विकसित होत असून रियल इस्टेट क्षेत्र सर्वाधिक वेगाने विकसित होणारे व रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्राकडे गांभिर्याने पाहणे काळाची गरज आहे. एस्पिरेशनल, मध्यम वर्गाची लोकसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत परवडणारी, सुनियोजित घरे देणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शहरे विकासाची ग्रोथ इंजिन असून देशाचा 65टक्के जीडीपी शहरांत तयार होतो. म्हणून शहरांत ईज ऑफ लिव्हिंग असले पाहिजे. घनकचरा, द्रवकचरा व्यवस्थापन योग्य झाले पाहिजे. हरित बांधकामाकडे लक्ष दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नरेडकोसारख्या संस्था विकासकांना एकत्र करत आहेत. या माध्यमातून राष्ट्रउभारणीचे काम करायचे आहे, त्यात आपण सहभागी होत आहोत, अशा विचाराने मंथन व चिंतन झाले पाहिजे, असे आवाहन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रियल इस्टेट क्षेत्रातील समस्या, अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही सांगितले. तसेच, महाराष्ट्रामध्ये रेरा नोंदणीकृत प्रकल्पांची संख्या 50,000 इतकी देशात सर्वाधिक असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार प्रविण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार संदिप जोशी, नरेडको विदर्भ संस्थेचे नवनिर्वाचित पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra has the highest number of RERA registered projects in the country – Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात