Amit Shah : भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानचे झाले मोठे नुकसान झाले, अमित शहांचा दावा

Amit Shah

अमित शहा म्हणाले, जेव्हा सीमा सुरक्षेवर इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ऑपरेशन सिंदूर सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Amit Shah भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त करण्यासाठी स्वदेशी विकसित ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याची पुष्टी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.Amit Shah

गुजरातमधील अहमदाबाद येथे भाषण करताना अमित शाह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीनकडून घेतलेली पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली कुचकामी ठरली. यामुळे दहशतवादाविषयीचा त्यांचा खोटारडेपणा जगासमोर आला.



गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ” आपल्या स्वदेशी विकसित ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीने पाकिस्तानची हवाई तळं उद्ध्वस्त केली. हवाई दलाने अचूक हल्ले केले आणि पाकिस्तानमधील अनेक ठिकाणाचे मोठे नुकसान केले.”

अमित शहा म्हणाले, जेव्हा सीमा सुरक्षेवर इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ऑपरेशन सिंदूर सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. पूर्वी सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ले केवळ पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पुरते मर्यादित होते. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या हद्दीत १०० किलोमीटर आत प्रवेश केला. यामुळे दहशतवादी आणि त्यांचे अड्डे नष्ट झाले.

Pakistan suffered huge losses due to India’s BrahMos missiles claims Amit Shah

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात