Chief Minister Sarma : गौरव गोगोई आयएसआयच्या निमंत्रणावर पाकिस्तानात, मुख्यमंत्री सरमा यांचा गंभीर आरोप

Chief Minister Sarma

विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : Chief Minister Sarma  काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई हे पाकिस्तान सरकारच्या थेट निमंत्रणावर आयएसआयच्या संपर्कात येऊन तिकडे गेले होते आणि परतल्यावर त्यांनी राफेल लढाऊ विमान खरेदीचा तीव्र विरोध केला, असा गंभीर आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. हा दौरा पर्यटनासाठी नव्हता तर प्रशिक्षणासाठी होता, असा दावा करत सरमा यांनी सांगितले की, याचे सर्व पुरावे सरकारकडे उपलब्ध आहेत आणि ते लवकरच जनतेसमोर मांडले जातील.Chief Minister Sarma

मुख्यमंत्री सरमा म्हणाले, “गौरव गोगोई पाकिस्तान सरकारच्या गृह मंत्रालयाच्या निमंत्रणावर गेले होते. हे निमंत्रण ना परराष्ट्र मंत्रालयाचे होते, ना सांस्कृतिक कार्यक्रमाचे. जेव्हा गृह मंत्रालय कुणाला बोलावते, तेव्हा हेतू स्पष्ट असतो प्रशिक्षण हे सर्वांना माहिती आहे.आमच्याकडे याचे लेखी पुरावे आहेत. मी हे पहिल्यांदाच उघडपणे सांगतो आहे.”



सरमा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “जर माझ्या वक्तव्यातील एकही शब्द खोटा ठरला, तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन. आम्ही १० सप्टेंबरपर्यंत सारे पुरावे जनतेसमोर ठेवू. हे कागदपत्र आम्ही वकीलांच्या माध्यमातून सादर करणार असून, दूतावासामार्फत अधिकृत प्रत्या मिळवणार आहोत.”

या वक्तव्यामुळे आसामातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली, तरी भाजप नेत्यांनी गोगोई यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी काँग्रेसवर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला.

सरमा यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सूचित केले की, “पाकिस्तानच्या आयएसआय आणि काँग्रेसमधील काही नेत्यांमध्ये संबंध असल्याचे ठोस पुरावे लवकरच समोर येणार आहेत. राफेलसारख्या देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या प्रकल्पांवर विरोध करणे ही राष्ट्रविरोधी भूमिका आहे आणि ती कोणाच्या दडपणाखाली घेतली गेली, हे आता स्पष्ट होणार आहे.”

Gaurav Gogoi in Pakistan on ISI invitation, serious allegations by Chief Minister Sarma

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात