विशेष प्रतिनिधी
पुरी : YouTuber Priyanka Senapati पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राशी घनिष्ठ संबंध आणि पाकिस्तानातील करतारपूर कॉरिडॉरला झालेल्या दौऱ्यामुळे ओडिशातील यूट्यूबर प्रियांका सेनापती सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. गुप्तचर विभागाने तिच्या हालचाली आणि संबंधांची चौकशी सुरू केली आहे.YouTuber Priyanka Senapati
पुरीचे पोलीस अधीक्षक विनीत अग्रवाल यांनी सांगितले की, प्रियांका आणि ज्योती यांच्यातील मैत्री, तसेच प्रियांकाची पाकिस्तान यात्रा या दोन्ही गोष्टींचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी प्रियांकाने आपल्या यूट्यूब चॅनेल ‘Prii_vlogs’ वर “Odia Girl in Pakistan | Kartarpur Corridor Guide | Odia Vlog” हा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.
सध्या पुरीत राहणाऱ्या प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत स्पष्ट केले आहे की, “ज्योती ही केवळ माझी यूट्यूबमधून ओळख झालेली मैत्रीण होती. ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत आहे, याची मला कल्पनाही नव्हती. देश माझ्यासाठी सर्वोच्च आहे, आणि तपास यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य मी करायला तयार आहे. जय हिंद!”
प्रियांकाच्या वडिलांनीही स्पष्ट केले की, “सप्टेंबर 2024 मध्ये ज्योती पुरीला आली होती, पण ती आमच्या घरी कधीच आली नाही. प्रियांका एका मित्रासोबत करतारपूरला गेली होती, तिच्याकडे योग्य प्रवास कागदपत्रं होती. ती एक विद्यार्थीनी आहे आणि ज्योतीच्या देशविरोधी कारवायांची तिला काहीच माहिती नव्हती.”
सध्या पोलीस ज्योती मल्होत्राच्या पुरीतील संपर्कांचे विश्लेषण करत असून, तिचा संशयास्पद लोकांशी काही संबंध होता का, हे शोधले जात आहे.
ज्योती मल्होत्रा हिला हरियाणा पोलिसांनी अटक केली असून, ती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या थेट संपर्कात होती, असे तपासात समोर आले आहे. १३ मे रोजी भारताने त्या पाकिस्तानी अधिकाऱ्याला ‘persona non grata’ घोषित करत देशातून हकालपट्टी केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App