विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah आता आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला घाबरत नाही, आम्ही पाकिस्तानमध्ये १०० किमी आत घुसून प्रत्युत्तर दिलं आहे,” असा थेट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पाकिस्तान व दहशतवाद्यांवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची सैनिकी ताकद पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित केली.Amit Shah
शहा म्हणाले, “२०१४ पूर्वी भारतात सातत्याने दहशतवादी हल्ले होत असत, मात्र त्यांना कधीच ठोस उत्तर दिलं जात नव्हतं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून या धोरणात आमूलाग्र बदल झाला आहे. आता प्रत्येक हल्ल्याला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिलं जातं.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानात घुसून थेट दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. आमची एअर डिफेन्स सिस्टीम अत्यंत सक्षम आहे. त्यामुळेच आज पाकिस्तान भयभीत झाला आहे आणि अणुबॉम्बच्या धमक्या देऊन स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
अमित शहा यांनी उरी, पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यांचा उल्लेख करत सांगितलं की, “उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामानंतर एअर स्ट्राईक, आणि आता पहलगामच्या हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’सारखं निर्णायक उत्तर भारताने दिलं. जगभरातील संरक्षण तज्ज्ञ या कारवाईचं विश्लेषण करताना अचंबित झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ विकासाचे नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेचेही अध्वर्यू आहेत. त्यांनी देश सुरक्षित ठेवण्यासह जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढवली आहे.
शहा यांनी स्पष्ट केलं की, “आता भारत मागे हटणारा देश राहिलेला नाही. आम्ही कारवाई करतो आणि शत्रूंना तिथेच थांबवतो. अणुबॉम्बच्या नावाने धमकावणाऱ्यांना आम्ही आता घाबरत नाही, उलट त्यांच्या मनांत भीती निर्माण झाली आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App