पाकिस्तानची भारताविरुद्ध copy-paste diplomacy; पण शिष्टमंडळात करावी लागली माजी मंत्र्यांची आणि नोकरशाहांचीच भरती!!

Pakistan

नाशिक : पाकिस्तान हा मूळात “ओरिजिनल” देशच नाही. तो भारताच्या द्वेषापोटी जन्माला घातला गेला. भारत द्वेषाने तो पोसला आणि पछाडला गेला. त्यामुळे पाकिस्तान नावाची कुठली स्वतंत्र entity उभी राहू शकली नाही. त्यामुळे त्या देशाने कुठल्याही स्वतंत्र धोरणाची निर्मिती केली नाही. त्याचीच साक्ष पाकिस्तानच्या copy-paste diplomacy मधून समोर आली. Pakistan

भारतीय सैन्य दलाने operation sindoor यशस्वी केल्यानंतर भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडण्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारने भारतातल्या सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवून भारताची दहशतवादाविरुद्धच्या लढाईची कठोर भूमिका समजावून सांगण्याची जबाबदारी या शिष्टमंडळांवर दिली. एकूण 7 शिष्टमंडळांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या 54 खासदारांचा समावेश केला. या खासदारांची निवड करताना तरुण आणि dynamic खासदारांची निवड करायची योग्य काळजी मोदी सरकारने घेतली. त्यामुळे भारत दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकजूटीने उतरला, असे चित्र सुरुवातीपासूनच निर्माण झाले. ही शिष्टमंडळे जगभरातल्या 42 देशांना भेट देणार असून त्यांचे दौरे 20 मे पासून सुरू होणार आहेत. Pakistan

पण भारताने अशी international diplomacy ची नवी रणनीती आखताच पाकिस्तानलाही या diplomacy ची copy हाणायची खुमखुमी आली. पाकिस्तान मधल्या शहाबाज शरीफ सरकारने भारतीय diplomacy ची खरंच copy paste केली. पाकिस्तानने देखील वेगवेगळ्या देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवायचा निर्णय घेतला, पण भारताची 7 शिष्टमंडळे परदेश दौऱ्यांवर जाणार असताना प्रत्यक्षात पाकिस्तान मात्र एकच शिष्टमंडळ तयार करू शकले. पण या शिष्टमंडळाचे नेतृत्व करायला पाकिस्तान मध्ये दुसरा कुठला dynamic मुत्सद्दी सापडला नाही म्हणून शहाबाज शरीफ सरकारने त्याचे नेतृत्व माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांच्याकडे सोपविले. भारताने ज्या पद्धतीने सर्वपक्षीय खासदारांची निवड करून त्यातही तरुण नेत्यांना international exposure ची संधी दिली, तशी संधी पाकिस्तान देऊ शकला नाही.



कारण पाकिस्तानी शिष्टमंडळात शिरकाव करून घ्यायची ओढ पाकिस्तानच्या बड्या नेत्यांमध्ये आणि नोकरशहांमध्येच लागली. त्यामुळे पाकिस्तानी सरकारला बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात विद्यमान मंत्री, माजी मंत्री आणि माजी नोकरशहा यांचाच भरणा करावा लागला. त्या पलीकडे जाऊन पाकिस्तानला विचारच करता आला नाही. पाकिस्तानने बिलावल भुट्टो यांच्या शिष्टमंडळात ऊर्जा मंत्री मौसदीक मलिक, नवाज मुस्लिम लीगचे नेते खुर्मम दस्तगीर, पाकिस्तानी सेनेटर आणि माजी मंत्री शेरी रहमान, माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खर, मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचे (MQM) नेते माजी मंत्री फैजल सब्जवारी, माजी परराष्ट्र सचिव तहमिना जंजजूवा आणि माजी परराष्ट्र सचिव जलील अब्बास जिलानी यांचा समावेश केला.

भारताची 7 शिष्टमंडळे तब्बल 42 देशांमध्ये फिरणार असताना पाकिस्तानातले एकच शिष्टमंडळ अमेरिका, रशिया, इंग्लंड, बेल्जियम आणि फ्रान्स या पाचच देशांमध्ये फिरून पाकिस्तानी शांततेची भूमिका मांडणार आहे.

– पाकिस्तान फसला

याचा अर्थ असाच की, पाकिस्तानला भारताविरुद्ध कुठली नवी रणनीती ठरवता आली नाही. पण भारताची copy हाणताना देखील पाकिस्तान पूर्ण फसला. कारण पाकिस्तानला आपल्या शिष्टमंडळात ना सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश करता आला, ना त्या शिष्टमंडळांमध्ये कुठल्या तरुण आणि dynamic नेत्यांची निवड करता आली. पाकिस्तानला आपल्या शिष्टमंडळात जुन्या घिस्यापिट्या नेत्यांची निवड करावी लागली.

Pakistan’s copy paste diplomacy against India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात