वृत्तसंस्था
गाझा :Hamas targets इस्रायली सैन्याने हमासला पराभूत करण्यासाठी आणि त्यांच्या ओलिसांना सोडण्यासाठी गाझामध्ये एक मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत, इस्रायलने गेल्या ३ दिवसांत गाझावर अनेक मोठे हल्ले केले आहेत, ज्यामध्ये २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.Hamas targets
गेल्या २४ तासांतच गाझा पट्टीत हमासच्या १५० हून अधिक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. हमासचा नाश होईपर्यंत इस्रायल आपली मोहीम सुरूच ठेवेल, असे इस्रायलचे म्हणणे आहे.
इस्रायलने गाझावर नियंत्रण मिळवण्यासाठी ५ मे रोजी ‘गिदियन रॅरियट्स’ लष्करी कारवाई सुरू केली. मार्च २०२५ मध्ये इस्रायलने गाझाला अन्न आणि इंधन पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला. इस्रायली सरकारने दावा केला की, यामुळे हमास कमकुवत होईल.
गाझामधील ५ लाख लोक उपासमारीच्या संकटात
गेल्या १९ महिन्यांपासून गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे ५ लाख लोक उपासमारीच्या संकाटाचा सामना करत आहेत. १२ मे रोजी संयुक्त राष्ट्रांनी गाझातील परिस्थितीवर एक अहवाल सादर केला.
यानुसार, जर इस्रायलने निर्बंध हटवले नाहीत, तर गाझामधील प्रत्येक ५ पैकी १ व्यक्ती उपासमारीला बळी पडू शकते. याशिवाय २१ लाख लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू झालेल्या इस्रायल-हमास संघर्षात आतापर्यंत ६१ हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत.
गाझापासून फक्त ४० किमी अंतरावर धान्याचा साठा
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने म्हटले आहे की, त्यांच्याकडे अन्नसाठा संपला आहे. बहुतेक बेकरी आणि देणगीने चालवली जाणारी स्वयंपाकघरे बंद पडली आहेत.
गाझा येथील संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे (WFP) संचालक अँटोइन रेनार्ड यांच्या मते, या भागातील लोकसंख्येला पुरविण्यासाठी आवश्यक असलेले अन्न इस्रायल, इजिप्त आणि जॉर्डनमधील गोदामांमध्ये पडून आहे.
ही गोदामे गाझापासून फक्त ४० किमी अंतरावर आहेत. रेनार्ड म्हणाले की, गाझामधील WFP ची गोदामे रिकामी आहेत आणि एजन्सी आता १० लाखांऐवजी फक्त २००,००० लोकांना अन्न पुरवू शकते.
गाझा पट्टीतील उपासमार आणि दुष्काळाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी गाझाला अन्न पुरवठ्यावरील बंदी तात्काळ रद्द करावी अशी मागणी संयुक्त राष्ट्र आणि युरोपीय देशांनी इस्रायलकडे केली आहे.
जर इस्रायलने लष्करी कारवाई वाढवली तर बहुतेक लोकांना अन्न, पाणी, निवारा आणि औषधांची उपलब्धता राहणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App