Kapil sibal सर्वपक्षीय खासदारांची 7 शिष्टमंडळांमधून परदेशांमध्ये पाठवणी; पण कपिल सिबब्लांची (स्व)पाठ थोपटणी!!

Kapil sibal

नाशिक : 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळांमधून खासदारांची परदेशांमध्ये पाठवणी आणि कपिल सिब्बलांची (स्व)पाठ थोपटणी, असे राजकीय चित्र आज समोर आले. देशात काही चांगलं झालं, की ते आपल्यामुळं झालं, असा ढोल पिटायची “काँग्रेसी” प्रवृत्ती आज पुन्हा एकदा दिसली.

त्याचं झालं असं :

Operation Sindoor भारताने यशस्वी केल्यानंतर जागतिक पातळीवरून त्याच्या विविध प्रतिक्रिया उमटल्या विविध देशांनी भारताविषयी अनुकूल मत व्यक्त केले तरी अनेक देशांनी उघडपणे किंवा अडून प्रतिकूल देखील मत व्यक्त केले चीन तुर्कस्तान आणि अझरबैजान या तीन देशांनी तर उघडपणे पाकिस्तानलाच पाठिंबा दिला. पण युरोप आणि अमेरिकेतल्या देशांनी मात्र नेहमीप्रमाणे double speak भूमिका घेऊन भारत आणि पाकिस्तान यांना एकाच तागडीत तोलले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आगाऊपणे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीचे श्रेय घेतले.

याच दरम्यान सोशल मीडियातून फेक न्यूजचा मारा भारताला सहन करावा लागला. पाकिस्तानच्या प्रत्यक्ष हल्ल्यांपेक्षा फेक न्यूजचा हल्ला जास्त तीव्र होता आणि त्याला पश्चिमात्य देशांची साथ अधिक होती.

“या पार्श्वभूमीवर केंद्रातल्या मोदी सरकारने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत एक आहे असा संदेश देण्याचे ठरवून सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवायचा निर्णय घेतला. या शिष्टमंडळाचे वैशिष्ट्य असे की त्यांचे नेतृत्व वेगवेगळ्या पक्षाच्या तरुण खासदारांकडे सोपविले. त्यामध्ये शशी थरूर, रविशंकर प्रसाद, श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे, कनिमोळी यांचा समावेश केला. एकूण 7 शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांना भेटी देण्यासाठी नेमली. या शिष्टमंडळांनी पाकिस्तान वर परदेशात जाऊन diplomatic strike करावा, अशी रणनीती मोदी सरकारने आखली. या महिन्याच्या अखेरीस शिष्टमंडळे परदेशांमध्ये जायला रवाना होणार आहेत.*

पण मोदी सरकारची ही रणनीती समोर येताच काँग्रेस पक्षातल्या नेत्यांनी त्यामध्ये काही खुसपटे काढली. वास्तविक शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पदेशात जाणार आहे त्याचे श्रेय काँग्रेसने आपल्याकडे घेतले. शिष्टमंडळांमध्ये अन्य 3 खासदारांचाही समावेश करायला परवानगी दिली, पण मोदींनी काय केले नाही, हे मुद्दाम सांगितले. मोदींनी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थिती लावली नाही. संसदेची विशेष अधिवेशन बोलविण्याची काँग्रेसची मागणी स्वीकारली नाही, असे जयराम रमेश म्हणाले. भाजप मधला talent vacuum भरून काढण्यासाठी सरकारने शशी थरूर यांची शिष्टमंडळाच्या नेतेपदी निवड केल्याचा “जावईशोध” केरळ काँग्रेसने लावला.



सिब्बल काय म्हणाले??

पण त्या पलीकडे जाऊन कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे “श्रेय” स्वतःकडे ओढून घेऊन त्यासाठी स्वतःची पाठ थोपटून घेतली. वेगवेगळ्या देशांमधल्या सरकारांना आणि तिथल्या वेगवेगळ्या प्रभावशाली घटकांना Operation sindoor ही मोहीम समजावून सांगण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ परदेशांमध्ये पाठवावे अशी सूचना मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती, ती सूचना मोदींनी स्वीकारली, याचा मला आनंद होतो. मी नेहमी म्हणतो की मोदींनी आमचा सल्ला ऐकावा त्यामुळे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळू शकतील आणि अनेक प्रश्नांवर तोडगे निघू शकतील, असे कपिल सिब्बल पत्रकार परिषदेत म्हणाले.

26 11 चा हल्ला झाला तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अशीच सर्वपक्षीय शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवली होती त्यामुळे भारताला अनुकूल अशी वातावरण निर्मिती झाली होती पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचे मत सर्व देशांमध्ये निर्माण करण्यात भारतीय शिष्टमंडळे यशस्वी झाली होती, असे कपिल सिब्बल म्हणाले.

पण गेल्या 10 – 12 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी विरोधी पक्ष काय सांगतात याकडे लक्ष देत नाहीत ते विरोधी पक्षांचे ऐकत नाही असे दिसून आले पण पहेलगामच्या हल्ल्यानंतर विरोधकांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली त्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळे परदेशांमध्ये पाठवण्याची मागणी केली मोदींनी विरोधकांची दुसरी मागणी ऐकली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मोदींनी अनेक धोरणांमध्ये विरोधकांचे ऐकले, तर बरेच प्रश्न सुटतील. कारण विरोधकांनाही भारत मजबूत करायचा आहे, अशी कुस्ती कपिल सिब्बल यांनी जोडली.

पण या सगळ्यांमध्ये कपिल सिब्बल हे नरसिंह राव आणि अटल बिहारी वाजपेयी या दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुत्सद्यांना विसरले. पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांचा उल्लेख केला नाही. पण मोदी सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशांमध्ये पाठवणार असल्याचे श्रेय स्वतःकडे ओढवून घेण्यास मात्र कपिल सिब्बल विसरले नाहीत.

Kapil sibal takes credit of sending all party delegations to foreign countries

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात