IAEA : पाकिस्तान बदमाश देश, त्याची अण्वस्त्रे इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सीच्या निगराणी खाली आणा!!

वृत्तसंस्था

श्रीनगर : IAEA  पाकिस्तान हा एक बदमाश देश आहे. त्याने निर्माण केलेली अण्वस्त्रे त्याच्याच हातात “सुरक्षित” नाहीत. त्यामुळे पाकिस्तानची अण्वस्त्रे इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सीच्या (IAEA) निगराणी खाली आणा, अशी महत्त्वपूर्ण मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरच्या धरतीवरून केली.IAEA

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अण्वस्त्र युद्धाचा धोका होता. तो अमेरिकेने मध्यस्थी करून टाळला. दोन्ही देशांना व्यापाराची लालूच दाखवली, अशा डिंग्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मारल्या होत्या. पाकिस्तानने देखील भारताला अणुबॉम्ब युद्धाची धमकी दिली होती. पण भारताने पाकिस्तानचे nuclear blackmail तोडून पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अचूक प्रहार केले.



या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी श्रीनगर मध्ये भारतीय जवानांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर केलेल्या जाहीर भाषणात त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा धोका सगळ्या जगाला वाटतो, तर सगळ्या जगाने एकत्र येऊन पाकिस्तानची अण्वस्त्रे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी अर्थात IAEA च्या निगराणी खाली आणावीत, अशी गंभीर मागणी केली.

पाकिस्तान हा बदमाश देश (rogue state) आहे. त्यानेच निर्माण केलेली किंवा मिळवलेली अण्वस्त्रे त्याच्या हातात “सुरक्षित” नाहीत. त्यामुळे जागतिक समुदायाने एकत्र येऊन पाकिस्तानची अण्वस्त्रे इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी अर्थात IAEA च्या निगराणी आणावीत, ही सूचना मी जागतिक समुदायाला करतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थीचा आव आणून दोन्ही देशांना एकाच तागडीत तोलले होते, पण राजनाथ सिंह यांनी ठामपणे पाकिस्तानला बदमाश देश (rogue state) असे संबोधून त्याची सगळी अण्वस्त्रे IAEA च्या निगराणी खाली म्हणजेच आंतरराष्ट्रीय समुदायाच्या ताब्यातच घेऊन टाकण्याची मागणी केली. त्यामुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा मुद्दा अमेरिकेच्या हातून काढून घेऊन तो राजनाथ सिंग यांनी जागतिक पातळीवर ढकलून ठेवला.

IAEA: Pakistan is a rogue country, bring its nuclear weapons under the supervision of the International Atomic Energy Agency!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात