सुखबीर बादल यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक
विशेष प्रतिनिधी
चंदीगड :Sukhbir Badal शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) प्रमुख सुखबीर बादल यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ आणि स्पष्ट दृष्टिकोनाचे कौतुक केले.Sukhbir Badal
सुखबीर म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी ज्या पद्धतीने एका मुत्सद्दी राजकारण्याप्रमाणे राजनैतिक पद्धतीने परिस्थिती हाताळली, त्यामुळे पाकिस्तानला युद्धबंदीची याचना करण्यासाठी वॉशिंग्टनला धाव घ्यावी लागली. तसेच बादल त्यांनी भारतीय सशस्त्र दलांचेही अभिनंदन केले.
युद्धबंदीवर भाष्य करणाऱ्या राजकारण्यांवर टीका करताना सुखबीर म्हणाले की, हे असे नेते आहेत जे लढाईमुळे झालेले नुकसान पाहण्याऐवजी त्यांच्या ड्रॉईंग रूममध्ये टेलिव्हिजन स्क्रीनवर लढाई पाहत होते. पाकिस्तानसोबत आतापर्यंत झालेल्या सर्व युद्धांमध्ये पंजाबचे नुकसान झाले आहे.
युद्ध थांबवून सरकारने शहाणपणाने काम केले आहे. ते म्हणाले की काही नेते राज्याबाहेर बसून युद्ध पाहू इच्छितात. येथील नेते जे सरकारच्या निर्णयाला विरोध करत आहेत तेच देशाचे खरे शत्रू आहेत. असंही यावेळी बादल यांनी बोलून दाखवलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App