विशेष प्रतिनिधी
नागपूर : CM Fadnavis भारतीय लष्कराच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. या भाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली आहे. भारताची परराष्ट्र आणि संरक्षण विषयक भूमिका आता अधिक ठाम, निर्णायक आणि जागतिक स्तरावर प्रभावी झाली असल्याचे फडणवीस म्हणाले. ते आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.CM Fadnavis
ही भूमिका केवळ भारताच्या सुरक्षेसाठी नव्हे तर जागतिक दहशतवादविरोधी लढ्यासाठीही एक निर्णायक टप्पा आहे. पाकिस्तानने आतापर्यंत प्रत्येक हल्ल्यानंतर आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला, पण आता भारत अशा भ्रामक दाव्यांना बळी पडणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान मोदींचे तीन न्यू नॉर्मल
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भाषणात तीन ‘न्यू नॉर्मल’ सांगितलेले आहेत. पहिला म्हणजे कुठलीही दहशतवादी कारवाई हा भारतावर हल्ला समजला जाईल आणि त्याला तितक्याच तीव्रतेने उत्तर दिले जाईल. दुसरे म्हणजे भारत कोणताही ‘न्युक्लिअर ब्लॅकमेल’ भारत सहन करणार नाही. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे आतंकवादी घटना आणि त्याचे आका, तसेच तिथले सरकार यामध्ये आम्ही फरक करणार नाही. दरवेळी पाकिस्तान दहशतवादला खत पाणी घालते. नंतर नॉन स्टेट अॅक्टर्सनी अशाप्रकारची घटना केली आहे. त्याचा सरकारशी संबंध नाही, अशी भूमिका जागतिक स्तरावर मांडत असतो. आता नॉन स्टेट अॅक्टर्सनी दहशतवादासारख घटना केली, तरी त्याचे आका म्हणजे तिथले सरकार दोषी धरले जाईल आणि त्याचे उत्तर दिले जाईल, हे मोदींनी स्पष्ट केले.
भारताची भूमिका आता जागतिक व्यासपीठावर ठाम
‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी पंतप्रधान मोदींनी भाषणात दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घुसून अत्यंत अचूक आणि संयमित कारवाई केली. या कारवाईनंतर पाकिस्ताननेच भारताशी संपर्क साधून युद्धविरामाची विनंती केली, हेही मोदींनी नमूद केले. यामुळे भारताच्या सामरिक क्षमतेचा आणि जागतिक दबाव निर्माण करण्याच्या शक्तीचा प्रत्यय आला. “आता पाकिस्तानसोबत केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होईल,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे. भारताची भूमिका आता जागतिक व्यासपीठावर ठाम, निर्णायक आणि स्पष्ट झाली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मोदींनी दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली
26/11 च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर आपण जी भूमिका मांडली होती, तीच आता भारत सरकारने अधिकृत धोरण म्हणून स्वीकारली आहे. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर या भूमिकेकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आज पंतप्रधान मोदींनी दहशतवाद आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या शक्तींविरुद्ध ठाम भूमिका घेतली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App