Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!

मराठ्यांनी सिंधू नदी जिंकली, चिनाब, रावी, झेलम पार केली, अटक किल्ला जिंकून घेतला. अटकेपार झेंडे लावले, त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत लढाई नेऊन ठेवली. Operation sindoor ची खरी फलश्रुती ठरली, जिच्याकडे अजून फारसे कुणी लक्ष दिले नाही. पण म्हणून या फलश्रुतीचे महत्त्व कमी होत नाही. Operation sindoor

त्या वेळी भारत अखंड होता. उत्तरे पर्यंत मराठ्यांच्या फौजा दौडत होत्या. दिल्लीत त्यांनी मुघल सत्तेवर धाक जमवला होता. मुघलांची सत्ता खिळखिळी केली होती. पण दिल्लीतल्या मुस्लिम सरदारांनी अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीला दिल्लीवर आक्रमण करायला बोलवून भारतात परक्याला घेतला. त्यांचे पारिपत्य करण्यासाठी रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजा दिल्लीपासून ते अटकेच्या किल्ल्यावर पोहोचल्या होत्या. 10 ऑगस्ट 1758 रोजी तिथे जरीपटका फडकवला होता. मानाजी पायगुडे यांनी आधीच लाहोर जिंकले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या पराक्रमाचा तो कळस होता.

Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी अटकेच्या पुढ्यात असलेल्या कुशाब हवाई तळ, नूर खान हवाई तळ, किराणा हिल्सवर ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आणि बंकर स्फोटक बॉम्बचा अचूक मारा करून पाकिस्तानच्या छातीवर (heart land of Pakistan) जबरदस्त प्रहार केला. पाकिस्तानी अण्वस्त्र साठ्याला धक्का लावला.

पण भारतीय फौजांना हा पराक्रम करायला 267 वर्षे जावी लागली. या दरम्यान अखंड भारत तुटला. पाकिस्तानची निर्मिती झाली. सिंधू नदी भारतीयांना कायमची अंतरली, असा भास निर्माण केला गेला. पण पाकिस्तानी राज्यकर्त्यांना दहशतवाद नामक राक्षस पोसायची दुर्बुद्धी झाली. त्यामुळे भारतीय राज्यकर्त्यांना लढाई पाकिस्तानच्या मध्यवर्ती भूमीत नेण्याची संधी मिळाली. वास्तविक ही संधी गेल्या 40 वर्षांमध्ये अनेकादा आली होती. पण आधीच्या भारतीय राज्यकर्त्यांनी त्या संधीचा वापर करायची राजकीय धमक दाखवली नव्हती. ही धमक मोदी सरकारने दाखवून दिली. कुठलीही लढाई शत्रूच्या भूमीत जाऊन लढावी. त्या भूमीचे नुकसान करावे. तिथे जाऊन शत्रूला पाणी पाजावे, ही युद्धशास्त्रातली रणनीती 267 वर्षांपूर्वी 1758 मध्ये मराठ्यांनी वापरली होती, ती मोदी सरकारने 2025 मध्ये repeat केली.



– Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

भारतीय फौजांनी दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान हा “सुरक्षित स्वर्ग”‌ शिल्लक ठेवला नाही, हेच ऑपरेशन सिंदूरचे सगळ्यात मोठे यश ठरले!! भारतीय सैन्य दलांनी precision and professional attack करून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या लष्करी पोशिंद्यांचे असे काही कंबरडे मोडले, की आता इथून पुढे पाकिस्तानात दहशतवादी एका ठिकाणी ट्रेनिंग घेतील आणि दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जाऊन सुरक्षित राहतील, अशी शक्यता भारतीय फौजांनी शिल्लक ठेवली नाही.

कारण भारतीय फौजा पाकिस्तानात कुठेही घुसून एकतर त्यांचे ट्रेनिंग कॅम्पस तरी उडवतील, नाहीतर त्यांची राहण्याची ठिकाणे तरी उद्ध्वस्त करून टाकतील. यासाठी भारतीय फौजा इस्रोच्या उपग्रहांपासून ते सर्व अत्याधुनिक विमाने आणि मिसाईल्स पर्यंत सर्व शस्त्रांचा बिनधास्त वापर करतील, हा “मेसेज” पाकिस्तानी दहशतवादी आणि त्यांच्या आकांना दिला आहे.

आत्तापर्यंत पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचे आका पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI च्या कडेकोट बंदोबस्तात चार – चार मजली बंगल्यांमध्ये सुरक्षित राहात होते. भारतात दहशतवादी कारवाया करून पाकिस्तानात जाऊन मजा मारत होते. त्यांना कुणी हात लावू शकणार नाही, असा पाकिस्तानने त्यांचा समज करून दिला होता. पण तो समज भारतीय फौजांनी ऑपरेशन सिंदूर मधून खोटा ठरविला.

भारताने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या वेळी पाकिस्तानात नियंत्रण रेषेजवळ किंवा आंतरराष्ट्रीय सीमेजवळ कारवाई करून तिथले दहशतवादी कॅम्पस नष्ट केले होते. पण यावेळी मात्र भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानच्या हद्दीत खोलवर घुसून ISI गुप्तहेर संघटना चालवत असलेले मुरिदके आणि बहावलपूर इथले दहशतवादी कॅम्प आणि दहशतवाद्यांची राहण्याची ठिकाणे उद्ध्वस्त केली. पाकिस्तानातले 14 हवाई तळ नष्ट केले. त्यामुळे भारताची अचूक आणि संहारक मारक क्षमता पाकिस्तानच्या लक्षात आली.

पण त्या पलीकडे जाऊन भारतीय सैन्य दलाने रा रावळपिंडीपर्यंत वेगळी धडक मारली. भारतीय हवाई दलाने precision and professional attack करून इस्लामाबाद मधला चकला, सरगोधा, कुशाभ इथले हवाई तळ नष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानातले दहशतवादी आणि त्यांचे आका पाकिस्तान मधल्या सर्वांत सुरक्षित आणि कडेकोट बंदोबस्ताच्या मानल्या गेलेल्या ठिकाणांवर देखील सुरक्षित राहणार नाहीत, हे सिद्ध झाले. दहशतवादी आणि त्यांचे आका पाकिस्तानात ज्या “सुरक्षित” ठिकाणी जातील, तिथे भारतीय फौजा अत्याधुनिक हत्यारांनी पोहोचून त्यांना ठोकतील, हा सगळ्यात कठोर आणि अचूक “मेसेज” ऑपरेशन सिंदूरने दिला. गोली का जबाब गोले से मिलेगा हे मोदी म्हणाले, ते प्रत्ययाला आले. पण त्या पलीकडे जाऊन मोदी सरकारने अखंड भारताची खरी लढाई सुरू केली आहे!!

After 267 years Bharat again reached attack now in Pakistan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात