मोदींची आदमपूर हवाई तळाला भेट; बहादूर जवानांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी पंजाब मधल्या होशियारपूर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या आदमपूर हवाई तळाला भेट दिली. तिथल्या बहादूर जवानांची संवाद साधत त्यांच्याविषयी संपूर्ण देशाची कृतज्ञता व्यक्त केली.

रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत. व्यापार आणि दहशतवाद, दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालणार नाहीत, असा स्पष्ट इशारा देणारे भाषण केल्यानंतर पंतप्रधान मोदी आज सकाळीच आदमपूर येथे पोहोचले. तिथे त्यांनी भारतीय हवाई दलाच्या जवानांची आपुलकीचा संवाद साधला.

जवानांनी देखील भारत पाकिस्तान संघर्षात आलेले अनुभव पंतप्रधानांना कथन केले. पंतप्रधानांसमवेतच त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देऊन आपण भारताच्या संरक्षणासाठी सिद्ध असल्याचे दाखवून दिले.

Narendra Modi today visited Air Force Station, Adampur in Punjab

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात