विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हवाई दलाने इस्लामाबाद आणि रावळपिंडी नजीक नूर खान हवाई तळावर अचूक हल्ला करून मारा केल्यानंतर “अचानक” भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली. नूर खान हवाई तळावरील हल्ला यात turning point ठरल्याचे बोलले गेले, कारण त्याच्या नजीकच्याच किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना भारताने धक्का लावल्याचे मानले गेले. त्यातून पाकिस्तानात अणू किरणोत्साराचा म्हणजेच atomic radiation चा धोका वाढला. अमेरिकेच्या विमानाला तिथे टेहळणी करावी लागली. पाकिस्तानात रेडिएशन विरोधी बोरॉन मूलद्रव्य मागवावे लागले. ते इजिप्शियन विमानातून तिथे पोहोचले.
*या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलांच्या तिन्ही डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए. के. भारती यांना प्रश्न विचारण्यात आला भारतीय हवाई दलाने किराणा हिल्स वरील पाकिस्तानी atomic installations ना धक्का लावलाय का??, त्यावर एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले, “thank you very much किराणा हिल्स वर पाकिस्तानचे atomic installations आहेत, हे तुम्ही आम्हाला सांगितले. आम्हाला ते “माहिती” “नव्हते”, पण भारतीय हवाई दलाने जी काही किराणा हिल्स आहे, तिथे कुठेही हल्ला केला नाही. तसे माझ्या कालच्या ब्रीफिंग मध्ये नव्हते आणि आजच्या ब्रीफिंग मध्येही नाही!!””
#OperationSindoor | Delhi: When asked if India hit Kirana Hills, Air Marshal AK Bharti says, "Thank you for telling us that Kirana Hills houses some nuclear installation, we did not know about it. We have not hit Kirana Hills, whatever is there." pic.twitter.com/wcBBVIhif1 — ANI (@ANI) May 12, 2025
#OperationSindoor | Delhi: When asked if India hit Kirana Hills, Air Marshal AK Bharti says, "Thank you for telling us that Kirana Hills houses some nuclear installation, we did not know about it. We have not hit Kirana Hills, whatever is there." pic.twitter.com/wcBBVIhif1
— ANI (@ANI) May 12, 2025
मात्र “असे” उत्तर देऊन एअर मार्शल भारती यांनी अप्रत्यक्षपणे कानावर हात ठेवले. भारती यांच्या या उत्तरानंतर पत्रकार परिषदेत हास्याची लकेर पसरली. त्यामुळे सगळ्यांना भारती यांच्या उत्तरा मधले between the lines व्यवस्थित लक्षात आले.
– इस्लामाबाद ते कराची हवाई हल्ले
एअर मार्शल भारती यांनी आजच्या पत्रकार परिषदेत नकाशे आणि फोटो दाखवून भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांची तपशीलवार माहिती दिली. भारतीय हवाई दलाने सुरुवातीला 7 पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केल्याचे सांगितले होते. त्यानंतर काल रात्री उशिरा खुलासा करून 11 पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केल्याचे भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले होते. मात्र आज एअर मार्शल भारती यांनी दाखविलेल्या नकाशात इस्लामाबाद, लाहोर पासून कराची पर्यंत 14 पाकिस्तानी हवाई तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ले केल्याचे दिसून आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App