‘सर्व भारतीय वैमानिक परतले आहेत’, ऑपरेशन सिंदूरवर एअर मार्शलचे मोठे विधान

Operation Sindoor

आपण अजूनही हवाई युद्धाच्या परिस्थितीत आहोत, असंही सांगण्यात आलं आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजल्यापासून ही युद्धबंदी लागू झाली. युद्धबंदीनंतरही पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली, ज्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, पाकिस्तानी हवाई तळांवर आणि इतर महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर भारताचे सर्व वैमानिक सुरक्षितपणे परतले आहेत, असे सशस्त्र दलांनी आज सांगितले. आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत पाकिस्तानने दोन भारतीय विमाने पाडल्याच्या दाव्याबद्दल विचारले असता, अधिकाऱ्यांनी अजूनही युद्धाची स्थिती असल्याचे सांगून भाष्य करण्यास नकार दिला.

रविवारी झालेल्या एका पत्रकारपरिषद दरम्यान, एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की आपण अजूनही हवाई युद्धाच्या परिस्थितीत आहोत, त्यामुळे त्यावर भाष्य करू इच्छित नाही, ते शत्रूसाठी फायदेशीर ठरेल. आम्ही आमचे ध्येय साध्य केले आहे. आमचे सर्व वैमानिक सुखरूप परतले आहेत.

All Indian pilots have returned Air Marshals big statement on Operation Sindoor

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात