Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

JD Vance

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातल्या चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नव्हता, असा स्पष्ट खुलासा भारतीय सूत्रांनी आज केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुबॉम्बचे युद्ध भडकेल म्हणून अमेरिकेने मध्यस्थी करून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी घडवली असे narrative न्यूयॉर्क टाइम्स आणि CNN या अमेरिकन माध्यमांनी चालविले त्याला भारतीय अधिकृत सूत्रांनी प्रत्युत्तर दिले. जे. डी. व्हान्स आणि नरेंद्र मोदी यांच्या चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेख आला नाही, असे भारतीय अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.

भारताला मान्य असेल, तर पाकिस्तानला शस्त्रसंधी करायची आहे, एवढाच मेसेज दोन्ही नेत्यांचा चर्चेतून पुढे आला. पाकिस्तानने इथून पुढे आगाऊपणा केला किंवा कुठली आगळीक केली, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक असेल. बाकी समोरच्या ऑफर बद्दल मी प्रतिऑफर देण्याचा प्रश्नच नाही, असे प्रत्युत्तर मोदींनी दिले.

Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!

ऑपरेशन सिंदूर मध्ये 7 ते 10 मे 2025 या चार दिवसांमध्ये भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानात केलेल्या कारवाईत 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले त्याचबरोबर पाकिस्तानचे 35 ते 40 सैन्याचे अधिकारी आणि सैनिक मारले गेले, अशी माहिती भारताचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आत्तापर्यंत भारताने फक्त 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची माहिती अधिकृतपणे दिली होती. परंतु आज लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले गेल्याची बातमी दिली.

लेफ्टनंट जनरल राजीव घई, डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए. के. भारती आणि डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशन्स व्हाइस ऍडमिरल ए. एन. प्रमोद यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात सविस्तर माहिती देणारी पत्रकार परिषद घेतली. भारतीय सैन्य दलांचे सुरुवातीचे सर्व हल्ले फक्त दहशतवादी केंद्रांवर होते पण पाकिस्तानने भारतीय सैन्य दलांवर आणि सामान्य नागरिकांवर हल्ले केल्यानंतर भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानी सैन्य दलांवर प्रतिहल्ले केले. त्यामध्ये पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले गेले, अशी माहिती राजीव घई यांनी दिली.

Modi to j. D. Vance : पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

पाकिस्तानने इथून पुढे आगाऊपणा केला, भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक असेल, अशा स्पष्ट शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांना बजावले होते. ही माहिती आता उघड झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीवर न्यूयॉर्क टाइम्सने विपर्यास करणारे रिपोर्टिंग केल्यानंतर त्या रिपोर्टिंगला भारतीय सूत्रांनी प्रत्युत्तर दिले, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्यातल्या संभाषणाचा संदर्भ दिला.

दहशतवाद्यांनी पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांची धर्म विचारून हत्या केली, त्यावेळी जे. डी. व्हान्स भारताच्या दौऱ्यावर होते. हल्ला झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला. त्यावेळी मोदींनी पाकिस्तानने आगाऊपणा केलाय. भारताचा प्रतिकार अधिक विध्वंसक असेल, असे व्हान्स यांना सुनावले होते, असे सूत्रांनी सांगितले.

US Vice President JD Vance called up PM Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात