PM Modi : ऑपरेशन सिंदूरबद्दल पी. चिदंबरम यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

PM Modi

‘त्यांची युद्धनीती खूप चांगली आहे’, असंही म्हणाले आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली. PM Modi भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावानंतर अखेर शनिवारी युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. सध्या दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेला एक स्तंभ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यांनीत्यांच्या लेखात पंतप्रधान मोदींचे कौतुक केलेPM Modi

चिदंबरम यांनी त्यांच्या कॉलममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्ध धोरणाचे कौतुक केले आहे आणि भारताने पाकिस्तानला दिलेला प्रतिसाद ‘बुद्धिमान आणि संतुलित’ असल्याचे वर्णन केले आहे. तसेच ते म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सूड उगवण्याच्या तीव्र घोषणा होत होत्या, परंतु सरकारने मर्यादित लष्करी कारवाईचा मार्ग निवडून एक मोठे युद्ध टाळले.



पी चिदंबरम म्हणाले की, ही लष्करी कारवाई मर्यादित आणि सुनियोजित होती, ज्याचा उद्देश दहशतवादी संघटनांच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे होता. त्यांच्या लेखात त्यांनी पंतप्रधान मोदींचे हे पाऊल शहाणपणाचे असल्याचे वर्णन केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि सांगितले की भारताने पूर्ण युद्धाची परिस्थिती टाळून जागतिक स्थिरतेला प्राधान्य दिले.

चिदंबरम यांनी त्यांच्या लेखात २०२२ मध्ये पंतप्रधान मोदींनी व्लादिमीर पुतिन यांना बोललेल्या शब्दांचाही उल्लेख केला, ज्यात पंतप्रधान म्हणाले होते की ‘हा युद्धाचा काळ नाही’. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे हे शब्द जगाला अजूनही आठवतात आणि म्हणूनच अनेक देशांनी खाजगीरित्या भारताला युद्ध न करण्याचा सल्ला दिला.

P. Chidambaram praises PM Modi for Operation Sindoor

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात