विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने पुरता धडा शिकवला. त्यानंतरच पाकिस्तानला शस्त्रसंधी करावीशी वाटली म्हणून पाकिस्तानने अमेरिकेला विनंती केली. भारतीय हवाई दलाने operation sindoor सध्या थांबविले नसल्याचेच जाहीर केले.
या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रथमच उघडपणे भाष्य केले. ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्याची धडक पाकिस्तानी सैन्याचे हेडक्वार्टर रावळपिंडीपर्यंत पोहोचली, अशा स्पष्ट शब्दांमध्ये राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्य दलांच्या कारवाईचे उघडपणे वर्णन केले.
Operation sindoor ची सगळी दैनंदिन माहिती आतापर्यंत फक्त परराष्ट्र सचिन विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह हे देत होते. भारताने “प्रिसिजन आणि प्रोफेशनल” कारवाई केली. पाकिस्तानचे 7 हवाई तळ उद्ध्वस्त केले. 9 शहरांमध्ये दहशतवाद्यांची लाँच पॅड्स आणि त्यांच्या लष्करी तळांचे प्रचंड नुकसान केले. 100 + दहशतवादी मारले, ही सगळी माहिती या तिघांनीच दिली होती. त्यापेक्षा अधिक कुठलीच माहिती सरकारी पातळीवरून अधिकृतरित्या दिली गेली नव्हती.
सरकारचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एखाद दुसरे ट्विट केले होते. परंतु निर्णय प्रक्रियेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खालोखाल यांचे द्वितीय स्थान राहिले, ते राजनाथ सिंह आणि भारतीय सैन्य दलांचे चारही प्रमुख आत्तापर्यंत उघडपणे काहीही बोलले नव्हते. पण राजनाथ सिंह आज ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणालीच्या उत्पादन केंद्राच्या उद्घाटन समारंभात उघडपणे बोलले. भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी सैन्य दलाचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत कारवाई केल्याचे राजनाथ सिंह यांनी जाहीरपणे सांगितले. भारतीय सैन्य दलाने केवळ पाकिस्तानच्या सीमेनजीकच घुसून कारवाई केली असे नाही, तर त्या पलीकडे जाऊन रावळपिंडीपर्यंत कारवाईची धडक मारली. पाकिस्तानातली कुठलीही भूमी आता दहशतवाद्यांसाठी “सुरक्षित” राहिली नाही हे दाखवून दिले, असे राजनाथ सिंह म्हणाले.
त्यामुळे आता खुद्द संरक्षण मंत्र्यांच्या मुखातून भारतीय सैन्याने पाकिस्तानात किती खोलवर आणि कुठपर्यंत घुसून कारवाई केली, हे पहिल्यांदाच उघड झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App