Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

Asaduddin Owaisi

पाकिस्तान वापरत असलेले ड्रोन तुर्कीने बनवलेले असल्याचे समोर आले आहेत.


विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : Asaduddin Owaisi भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. ९ आणि १० मे रोजीच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्याच्या उद्देशाने क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि लढाऊ विमानांचा वापर केला. तथापि, भारतीय लष्कर आणि भारतीय संरक्षण यंत्रणेने हे हल्ले हाणून पाडले. यानंतर, भारतीय हवाई दलाने कारवाई करत क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानचे 6 हवाई तळ उद्ध्वस्त केले. याशिवाय, भारतीय सैन्याने अनेक रडार सिस्टीम देखील नष्ट केल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तान वापरत असलेले ड्रोन तुर्कीने बनवलेले असल्याचे समोर आले आहेत.Asaduddin Owaisi

याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘भारताने पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी तळावर किंवा नागरिकांवर हल्ला केलेला नाही. भारताने फक्त दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. जर युद्ध झाले तर त्याची जबाबदारी पाकिस्तानची असेल. जर पाकिस्तानला युद्ध करायचे असेल तर कोणताही देश गप्प बसणार नाही.’



‘आज इराण आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत आहेत. आम्ही तुर्कीच्या राष्ट्रपतींना आवाहन करतोय की, जर तुम्ही पाकिस्तानला मुस्लिम देश म्हणून पाठिंबा देत असाल, तर भारतात त्यांच्यापेक्षा जास्त मुस्लिम आहेत.’

Asaduddin Owaisi slams Turkey for supporting Pakistan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात