Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!

नाशिक : ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाल्यापासून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या पत्रकार परिषदेत आज तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची ढाल अशी सगळी पापे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी वाचली. त्यामध्ये त्यांनी पाकिस्तानने भारतातली मंदिरे, चर्च, गुरुद्वारा आणि मशीद यांनाही टार्गेट केल्याचे सांगितले, पण भारताने नेमका काय प्रतिहल्ला केला??, तो कुठे गेला आणि कसा केला??, याविषयी तपशीलवार काही सांगितले नाही. पाकिस्तानने ज्या प्रमाणात भारतावर हल्ला केला, तेवढाच आणि त्याच प्रमाणात भारताने पाकिस्तानवर प्रतिहल्ला करून प्रत्युत्तर दिले, एवढेच या तिघांनी स्पष्ट केले. पण त्यांच्या वक्तव्यांमध्ये बरेच between the lines दडले होते.

पाकिस्तानने भारतावर 400 पेक्षा जास्त ड्रोन सोडून हल्ले केले, त्यामुळे भारत प्रतिकार करणार हे त्यांना माहिती होते, पण तरी देखील त्यांनी पाकिस्तानी नागरी विमानतळ बंद केले नाहीत आणि नागरी हवाई वाहतूक देखील थांबविली नाही. त्यांनी नागरी विमानांची ढाल करून आपले विमानतळ वाचविले, असे विंग कमांडर योमिका सिंह म्हणाल्या. याचा अर्थच पाकिस्तानला भारताच्या अचूक हल्ल्याची भीती वाटली, असा होतो. भारताने ड्रोन अथवा मिसाईल मार्फत केलेले अचूक हल्ले आपल्या विमानतळांचे पूर्ण नुकसान करतील आणि आपली हवाई क्षमता नष्ट करतील हे लक्षात येताच पाकिस्तानने नागरी विमानांचेशची “ढाल’ करून सर्वसामान्य पाकिस्तानी प्रवाशांचा जीव धोक्यात घातला, पण भारताने संयम राखून त्या नागरी विमानांवर हल्ला केला नाही. पण यातून भारताची लढाई फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाशी आहे. सर्वसामान्य नागरिकांशी नाही हे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवून दिले. त्यामुळे भारताच्या कुठल्याही पाकिस्तान मधल्या हल्ल्यावर अमेरिकेपासून चीन पर्यंत कोणीही विरोधी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. उलट अमेरिकेच्या उपाध्यक्षांनी आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धात पडणार नाही, असे स्पष्ट सांगून हात झटकले. पण प्रत्यक्षात हा झटका पाकिस्तानला होता.

पाकिस्तानने भारताची 75 ड्रोन पाडली. भारताने पाकिस्तानातल्या मशिदींना टार्गेट केले होते, असा कांगावा तिथले उपपंतप्रधान इशाक दार यांनी पत्रकार परिषदेत केलाच होता, तो दावा विक्रम मिस्त्री यांनी खोडून काढला. उलट पाकिस्ताननेच भारतातल्या मंदिरे, चर्च आणि गुरुद्वारा यांच्यावर केलेल्या हल्ल्याचे फोटो दाखवून पाकिस्तानचे पाप उघड केले.

तुर्क + चिनी + पाकिस्तानी झ्यांगाट

पाकिस्तानने 400 तुर्की ड्रोन भारतावर सोडली. हे सगळे ड्रोन भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम नाकाम केले. पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांना गोळ्या घालणाऱ्या चार दहशतवाद्यांकडे होवेई कंपनीचे मोबाईल होते हे मोबाईल फक्त पाकिस्तानी सैन्यदले आपल्या सैनिकांनाच वापरायला देतात. पाकिस्तानात इतर सामान्य नागरिकांना ते मोबाईल उपलब्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती याच दरम्यान समोर आली. त्यातून चीन + पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांचे दहशतवादी झ्यांगट जगासमोर आले.

– प्रादेशिक सेना वापरायचे अधिकार लष्करप्रमुखांना

परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्य दलांच्या तिन्ही प्रमुखांची बैठक घेतली. त्या बैठकीची बातमी फोटोसह प्रसिद्ध झाली परंतु त्या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली याचे तपशील समोर आले नाहीत. पण प्रादेशिक सेना वापरायचे अधिकार लष्करप्रमुखांना दिल्याचे गॅझेट मात्र त्याच वेळी प्रसिद्ध झाले.

– माजी सैन्यदल प्रमुख मोदींना भेटले

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रेस ब्रेकिंग सुरू असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या निवासस्थानी भारतीय सैन्य दलांच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण केले होते. त्यामध्ये लष्कर हवाई दल आणि नौदल या तिन्ही सैन्य दलाच्या माजी प्रमुखांचा समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा केली. अर्थातच या चर्चेमध्ये भारत पाकिस्तान आणि चीन यापेक्षा वेगळा विषय असण्याची शक्यता नव्हती. पण मोदींनी आत्तापर्यंत केलेल्या कुठल्याच चर्चा मधले अनावश्यक तपशील कधी बाहेर आले नव्हते. पण नंतर त्याचे गंभीर परिणाम इतरत्र दिसले. 27 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचे पहिले उत्तर 7 मे रोजी मिळाले. ते उत्तर मिळणे अजून सुरूच आहे. त्याप्रमाणेच आजच्या चर्चेतले तपशील देखील अजून बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्याचे गंभीर परिणाम कधी दिसणार??, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Operation sindoor Pak unsuccessful drone attack

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात