भारतीय सैन्याच्या विजयाची पुरोगामी इस्लामिस्टांना धास्ती; म्हणून पाकिस्तानच्या बचावासाठी करताहेत “बौद्धिक कसरती”!!

नाशिक : “ऑपरेशन सिंदूर” मध्ये भारतीय सैन्याच्या विजयाची पुरोगामी इस्लामिस्टांना धास्ती वाटली म्हणूनच ते पाकिस्तानला वाचविण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती लढवायला समोर आल्याचे चित्र आज दिसून आले. फारूक अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, असदुद्दीन ओवैसी, शोएब जमई, अखिलेश यादव, किरण माने आदी नेत्यांच्या रूपाने या पुरोगामी इस्लामिस्टांनी बाहेर येऊन भारतीय नेतृत्वाला आणि सैन्याला आडून आडून पाकिस्तान वरचे हल्ले थांबवायचे सूचविले. या सगळ्यांची भाषा वरवरची तरी भारतीय सैन्याच्या बाजूची दिसली, तरी प्रत्यक्षात भारतीय सैन्याकडून पाकिस्तान जबरदस्त मार खावा लागतोय, हे पाहूनच पाकिस्तानला भारतीय हल्ल्यांपासून वाचवायचाच त्यांनी बौद्धिक कसरती केल्याचे उघड्यावर आले.

  • फारूक अब्दुल्लांना अचानक कळवळा

सिंधू जलपरार स्थगित करून भारताने ऑपरेशन सिंदूरचा दुसरा टप्पा सुरू केल्याबरोबर फारूक अब्दुल्लांना अचानक भारत हा देश महात्मा गांधींचा असल्याचा “साक्षात्कार” झाला. आम्ही एक वेळ पाकिस्तानचे पाणी तोडू, पण आम्ही एवढे क्रूर नाही की पाकिस्तान्यांना मारू, असे वक्तव्य फारुख अब्दुल्लांनी केले.

  • मेहबूबांना आता युद्ध नको

त्याचबरोबर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरचे नेहमीचे “व्हिक्टीम कार्ड” खेळायला सुरुवात केली. भारत आणि पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू-काश्मीर अगदी कोवळी मुले महिला मारल्या जात आहेत. या सगळ्यांचा काय दोष आहे??, मी दोन्ही बाजूंच्या पंतप्रधानांना विनंती करते त्यांनी फोन उचलून एकमेकांशी चर्चा करून हा संघर्ष थांबवावा, असे वक्तव्य केले. त्याचवेळी त्यांनी मोदींच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देऊन त्यात “मेख” मारून ठेवली. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या वेळी पंतप्रधान मोदींनी ही वेळ युद्धाची नाही असे वक्तव्य केले होते मोदींनी आता तेच आठवून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवावे, अशी सूचना मेहबूबा मुफ्ती यांनी केली. पुलवामा नंतर भारताने बालाकोट वर हल्ला केला पण त्यातून काय साध्य झाले असा सवाल मेहबूबा यांनी केला, पण या तवातूनच त्यांनी पाकिस्तानला मार खाण्यापासून वाचविण्याचाच प्रयत्न केला. कारण पाकिस्तानला जी नालायक हरकत करायची होती, ती पहलगाम मध्ये करून झाली आणि आता भारताने बदला घ्यायची वेळ आली, भारताने बदला घेणे सुरू केले, त्याचवेळी मेहबूबा मुफ्तींना भारत आणि पाकिस्तानचे युद्ध थांबविण्याची सूचना पंतप्रधान मोदींचे नाव घेऊन करावीशी वाटली.



 

  • अखिलेशना दोन दिवस सुट्टी हवी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या सर्व सरकारांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या, सैनिकांच्या, आपत्कालीन व्यवस्थांच्या सुट्ट्या रद्द केल्या, पण महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची सुट्टी द्यावी, अशी सूचना अखिलेश यादव यांना नेमकी आजच करावीशी वाटली. त्यांनी राजस्थानी फेटा बांधून पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेतच दोन दिवसांच्या सुट्टीची मागणी केली. एरवी अखिलेश यादव समाजवादी पार्टीच्या लाल टोपीत असतात, पण आजच त्यांना राजस्थानी फेटा बांधावासा वाटला आणि तो फेटा बांधून त्यांनी दोन दिवसांच्या सुट्टीची मागणी केली.

  • मुसलमानांना 15 मिनिटे सत्ता हवी

असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएम पक्षाचे नेते शोएब जमई यांना पाकिस्तानला आजच ठोकण्याची खुमखुमी आली. पण त्यासाठी त्यांना भारतात 15 मिनिटांसाठी तरी मुसलमानांची सत्ता असावी, असे वाटले. भारतीय मुसलमानांच्या ताब्यात 15 मिनिटे सत्ता द्या, मग आम्ही पाकिस्तानला कसे ठोकून काढतो ते पाहा, असे वक्तव्य शोएब जमई यांनी केले. भारतीय सैन्य पाकिस्तानला पुरते ठोकून काढत आहे, ते त्यांना पुरेसे वाटले नाही म्हणून त्यांनी भारतीय मुसलमानांच्या हातात पूर्ण सत्ता द्यायची मागणी करून पाकिस्तानला ठोकून काढायच्या बाता मारल्या.

  • मानेंना आजच “कुरूलकर” आठवला!!

उबाठा शिवसेनेचे नेते किरण माने यांना आजच देशाशी गद्दारी करणारा “कुरूलकर” आठवला. भारतीय माध्यमे भारतीय सैन्याच्या विजयाच्या फेक न्यूज चालवत आहेत. भारतीय सैन्याला त्यांचे काम करू द्या. बहुजनांची पोरे लढत आहेत, त्यांना लढू द्या. कुरुलकर समर्थक भक्तांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये, असे “तारे” किरण माने यांनी तोडले.

  •  पण भारतीय सैन्यात भेदभाव नाही

वास्तविक भारतीय सैन्य कुठलाही भेदभाव न बाळगता पाकिस्तानला ठोकून काढले आणि काढतंय. पाकिस्तानच 60 ड्रोन आणि मिसाइल हल्ले भारतीय सैन्याने पूर्णपणे परतावून लावले, याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी प्रेस ब्रीफिंग मध्ये दिली. भारतीय सैन्य दलाने कुठलाही भेदभावाचा संदेश आत्तापर्यंत पसरवला नाही आणि इथून पुढे पसरवण्याची शक्यता नाही. भारतीय नेतृत्वाने देखील कुठेही भेदभावयुक्त कारवाईचे आदेश सैन्याला दिलेले नाहीत. पाकिस्तान आणि तो पोसत असलेला दहशतवाद यांनाच भारतीय भूमीत आणि पाकिस्तानी भूमी मध्ये घुसून ठोकण्याचे आदेश भारतीय नेतृत्वाने दिलेत. त्यात कुठलीही शंका – कुशंका ठेवलेली नाही.

पण यातूनच भारताचा विजय निश्चित आहे, हे लक्षात आल्यानेच पुरोगामी इस्लामिस्टांना पाकिस्तानला वाचवावेसे वाटले, पण तसे उघडपणे बोलता किंवा लिहिता येईनासे झाले, म्हणूनच वेगवेगळे खुसपटी मुद्दे त्यांनी पुढे केले. शांतता आणि संवादाचे उमाळे आणले. भारतातला जातीयवाद आत्ताच उकरून काढला. पण या सगळ्यातून पुरोगामी इस्लामिस्टांनी पाकिस्तानला वाचविण्यासाठीच वेगवेगळ्या बौद्धिक कसरती केल्याचेच उघड्यावर आले. बाकी काही नाही!!

Progressive Islamists trying to save Pakistan from Indian revenge

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात