अमृतसर एअर बेसवर हल्ला केल्याचा पाकिस्तानी हॅन्डलर्स कडून फेक व्हिडिओ व्हायरल; भारतीय संरक्षण मंत्रालयाचा स्पष्ट खुलासा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतातल्या अमृतसर एअर बेसवर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानने करून काही व्हिडिओ व्हायरल केले. प्रत्यक्षात पाकिस्तानी हॅन्डलर्सनी वेगळ्याच ठिकाणच्या आगीचे व्हिडिओ व्हायरल केल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले.

अमृतसर एअर बेसवर कुठलाही हल्ला झालेला नाही. त्या एअर बेससह तर भारतातल्या सर्व एअर बेस वर हाय अलर्ट जारी आहे. परंतु पाकिस्तानी सोशल मीडिया हॅन्डलर्सनी 2024 च्या जंगलातल्या एका आगीचा व्हिडिओ शेअर करून पाकिस्तानने अमृतसर एअर बेस वर हल्ला केल्याचा दावा केला. प्रत्यक्षात तो व्हिडिओ आणि दावा खोटा असल्याचा खुलासा संरक्षण मंत्रालयाने केला.

“ऑपरेशन सिंदूर” अद्याप सुरू असून त्या संदर्भात भारत सरकार आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालय अधिकृतरित्या माहिती जाहीर करते. त्याच माहितीवर विश्वास ठेवावा. इतर कुठल्याही माध्यमांमधून आलेल्या फेक न्युजवर विश्वास ठेवू नये. त्या व्हायरल देखील करू नयेत, असे आवाहन संरक्षण मंत्रालयाने केले आहे.

Pakistan-based handles are spreading old videos falsely alleging strikes on a military base in Amritsar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात