गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि कर्टीन विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामंजस्य करार
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Harmony agreement मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे मायनिंगचे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि कर्टीन विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ऐतिहासिक करारानिमित्त उपस्थितांशी संवाद साधला.Harmony agreement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जागतिक दर्जाचे शिक्षण घेऊन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे एखाद्या राज्य विद्यापीठाशी थेट सहकार्य होणे हा पहिलाच आणि अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. गेल्या आठवड्याभरात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या नामवंत विद्यापीठासमवेत आपण सामंजस्य करार करत आहोत. तसेच, नुकत्याच पार पडलेल्या वेव्ह्ज 2025 मध्ये, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठासमवेत नवी मुंबई येथे त्यांच्या कॅम्पसच्या स्थापनेबाबत सामंजस्य करार करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नवी मुंबई येथे एज्यु सिटी उभारण्यात येत आहे. या जागतिक दर्जाच्या कॅम्पसचा उद्देश किमान 12 सर्वोच्च आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना येथे स्थापित करण्याचा आहे. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, आणि युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय यांसारख्या संस्थांनी आधीच सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. एज्यु सिटी हे 80 हजार ते एक लाख विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून उभे राहणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस विशेष आहे कारण आपण जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय दुर्लक्षित राहिलेल्या भागात, म्हणजेच गडचिरोली येथे घेऊन जात आहोत. मागास जिल्हा म्हणून ओळखला गेलेला गडचिरोली आज महाराष्ट्रातील सर्वात वेगाने प्रगती करणारा जिल्हा बनला आहे. लॉइड्स कंपनीच्या पुढाकारामुळे गडचिरोली हे खाण व पोलाद उद्योगात भारताचे ‘स्टील हब’ म्हणून उदयास येत आहे. या विकासाला चालना देण्यासाठी शैक्षणिक सहकार्य अत्यावश्यक आहे. गोंडवाना विद्यापीठाने केवळ 12 वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. कर्टीन विद्यापीठासमवेत हा नव्याने झालेला करार संशोधन, कौशल्यविकास आणि औद्योगिक गरजांसोबत शिक्षणाची जोड मजबूत करेल आणि त्यामुळे गडचिरोलीसह संपूर्ण भारताच्या खाण व धातुशास्त्र क्षेत्राला बळकटी मिळेल.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार परिणय फुके, ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेट जनरल पॉल मर्फी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App