केवळ दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : PM Modi पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला कठोर शिक्षा देण्याची तयारी करत आहे. या हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानवर एकामागून एक अनेक निर्बंध लादले आहेत. राजधानी दिल्लीत बरीच हालचाल दिसून येत आहे आणि काहीतरी मोठे घडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, संभाव्य ‘युद्ध’ लक्षात घेता, उद्या देशभरात मॉक ड्रिल आयोजित केले जात आहेत.PM Modi
पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करण्यापूर्वी उद्या, बुधवारी देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येत आहेत. यापूर्वी १९७१ मध्ये अशा प्रकारची मॉक ड्रिल घेण्यात आली होती. मॉक ड्रिल दरम्यान जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट असेल. या काळात सर्व घरे, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांचे दिवे बंद केले जातील. एवढेच नाही तर सायरनही मोठ्याने वाजतील. या सरावादरम्यान, नागरिकांना जगण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
मॉक ड्रिलच्या तयारीदरम्यान दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी आज दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. डोभाल आज पंतप्रधानांना भेटण्यासाठी एकटेच आले होते. दोघांमध्ये सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App