वृत्तसंस्था
ढाका : Chinmay Das बांगलादेशच्या चितगाव न्यायालयाने हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. चितगाव न्यायालयाचे वकील सैफुल इस्लाम अलिफ यांच्या हत्येप्रकरणी हा आदेश देण्यात आला.Chinmay Das
गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाच्या आवाराबाहेर वकिलाची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित इतर तीन अर्जांवर मंगळवारी सुनावणी होईल.
चितगाव महानगर दंडाधिकाऱ्यांनी अटकेसाठी पोलिसांचा अर्ज स्वीकारला आणि आभासी सुनावणीदरम्यान हा आदेश दिला.
वकिलाच्या मृत्यूप्रकरणी २१ जण अजूही तुरुंगात आहेत. सैफुल इस्लाम उर्फ अलिफ हा चितगावमध्ये सहाय्यक सरकारी वकील होता. न्यायालयाच्या आवारात सैफुल्लाहच्या मृत्यूनंतर, चितगाव वकील संघटनेचे अध्यक्ष नाझिम उद्दीन चौधरी यांनी आरोप केला होता की निदर्शकांनी सैफुल्लाहला त्यांच्या चेंबरमधून नेऊन मारले.
या प्रकरणाशी संबंधित ६ प्रकरणांमध्ये पोलिसांनी एकूण ५१ जणांना अटक केली होती. यातील मुख्य आरोपी चिन्मय दास, रिपन दास, राजीव भट्टाचार्य आणि इतर आहेत. या प्रकरणात अटक केलेले २१ जण अजूनही तुरुंगात आहेत.
बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाने चिन्मय दास यांच्या सुटकेलाही स्थगिती दिली.
यापूर्वी ३० एप्रिल रोजी, बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलीय विभागाने देशद्रोहाच्या प्रकरणात चिन्मय दास यांना जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती, त्यानंतर काही तासांतच हा आदेश मंजूर झाला. राज्य सरकारच्या वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर हा आदेश देण्यात आला.
राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या चिन्मय दास यांना ढाका उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. चिन्मय दास गेल्या ५ महिन्यांपासून देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. चिन्मय यांचे वकील अपूर्व कुमार भट्टाचार्य यांनी २३ एप्रिल रोजी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
ते चितगावला जात असताना पोलिसांनी त्यांना विमानतळावरून अटक केली.
बांगलादेश पोलिसांनी चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना ढाक्याच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरला अटक केली होती. मग ते चितगावला जाणार होते.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या इस्कॉन सदस्यांनी सांगितले की, डीबी पोलिसांनी कोणतेही अटक वॉरंट दाखवले नाही. ते फक्त एवढंच म्हणाले की त्यांना बोलायचं आहे. यानंतर ते त्यांना एका मायक्रोबसमधून घेऊन गेले.
ढाका महानगर पोलिसांच्या गुप्तहेर शाखेचे (डीबी) अतिरिक्त पोलिस आयुक्त रेझाउल करीम मलिक यांनी सांगितले होते की, पोलिसांच्या विनंतीवरून चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्यात आली.
यानंतर, चिन्मय दास यांना कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलिस ठाण्यात सोपवण्यात आले.
संत चिन्मय प्रभू कोण आहेत?
चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांचे खरे नाव चंदन कुमार धर आहे. ते चितगाव इस्कॉनचे प्रमुख आहेत. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना ५ ऑगस्ट २०२४ रोजी देश सोडून गेल्या. त्यानंतर हिंदूंविरुद्ध मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडल्या.
यानंतर, बांगलादेशी हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सनातन जागरण मंचची स्थापना करण्यात आली. चिन्मय प्रभू त्याचे प्रवक्ता बनले. सनातन जागरण मंचच्या माध्यमातून चिन्मय यांनी चितगाव आणि रंगपूर येथे अनेक सभांना संबोधित केले. त्यात हजारो लोक सहभागी झाले होते
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App