दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा दिला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: India-Pakistan रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत त्यांनी भारताला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले की ज्यांनी हा हल्ला केला आणि ज्यांनी हल्ल्याचा कट रचला त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट करून दिली.India-Pakistan
दूरध्वनी संभाषणादरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियामधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. रशियाच्या विजय दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, रशियन वृत्तसंस्था TASS ने वृत्त दिले आहे की पुतीन यांनी पंतप्रधान मोदींचे वार्षिक उच्चस्तरीय बैठकीसाठी भारत भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. चर्चेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले.
रविवारी तत्पूर्वी, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शिमला कराराला रशिया पाठिंबा देतो असे म्हटले होते. त्यांनी सांगितले की दोन्ही देशांनी या करारानुसार आणि १९९९ च्या लाहोर घोषणेनुसार त्यांचे प्रश्न सोडवावेत. या संभाषणाची माहिती रशियन सरकारने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App