पहलगाम हल्ल्यानंतर मिळालेल्या पाठिंब्याबद्दल भारताने व्यक्त केले कृतज्ञता
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-जपान संरक्षण मंत्रीस्तरीय बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर जपानकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे जपानी संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही बाजूंनी सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर विचारांची देवाणघेवाण झाली. द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा झाली.
भारत-जपान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत मजबूत एकता दाखवल्याबद्दल मी जपान सरकारचे आभार मानतो. भारत-जपान संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यात तुमच्या प्रचंड योगदानाचे मी कौतुक करतो.
या बैठकीची माहिती संरक्षण मंत्र्यांच्या अधिकृत एक्स खात्यातून देण्यात आली. संरक्षणमंत्र्यांनी लिहिले, “नवी दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी झेन यांना भेटून खूप आनंद झाला. भारत आणि जपानमध्ये एक विशेष, धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आहे. द्विपक्षीय बैठकीत आम्ही संरक्षण सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचा निषेध केला आणि सीमापार धोक्यांचा सामना करण्यासाठी सहकार्य आणि संयुक्त प्रयत्न वाढविण्याच्या गरजेवर भर दिला. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाकातानी झेन यांनी भारतासोबत एकता व्यक्त केली आणि भारताला पूर्ण पाठिंबा देऊ केला.
भारत आणि जपानमध्ये जुनी मैत्री आहे. २०१४ मध्ये या सहकार्याला विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीमध्ये स्थान दिल्यानंतर दोन्ही देशांमधील मैत्रीला नवी गती मिळाली आहे. संरक्षण आणि सुरक्षा हे दोन्ही देशांमधील संबंधांचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. धोरणात्मक बाबींवरील वाढत्या समन्वयामुळे अलिकडच्या काळात भारत आणि जपानमधील संरक्षण देवाणघेवाण मजबूत झाली आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशातील शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेच्या मुद्द्यांवर सामायिक दृष्टिकोनामुळे त्याचे महत्त्व वाढत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App