“नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय – सामाजिक जीवनात मोठी उलथापालथ होत असताना दोन अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांची भेट झाल्याची बातमी आज समोर आली.

शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या घरी आज भेट दिली. “नरकातला स्वर्ग” या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या समारंभाचे निमंत्रण त्यांनी शरद पवारांना दिले. स्वतः शरद पवारांनी x अकाउंट वर ही माहिती दिली.

संजय राऊत मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली काही दिवस तुरुंगात होते‌. तिथे त्यांना वेगवेगळे अनुभव आले. या वेगवेगळ्या अनुभवांवर आधारित त्यांनी पुस्तक लिहिले असून त्या पुस्तकाला त्यांनी “नरकातला स्वर्ग” असे नाव दिले आहे. लवकरच या पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ होणार असून त्याचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी “नरकातला स्वर्ग” या पुस्तकाची प्रत शरद पवारांना भेट दिली. त्याचबरोबर प्रकाशन समारंभाचे निमंत्रण दिले.

यावेळी संजय राऊत आणि शरद पवार यांच्यामध्ये रोहन तावरे यांनी वन्य जीवनावर लिहिलेल्या पुस्तकावरही सविस्तर चर्चा झाली. देशातल्या आणि राज्यातल्या विविध मुद्द्यांवर या दोघांनी मंथन केले. शरद पवारांनी संजय राऊत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Sanjay Raut invite Sharad Pawar for publication of his book “Narkatala Swarg”

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात