Bilawal Bhutto : आता बिलावल भुट्टो यांनी पाकिस्तानचा गुन्हा कबूल केला, म्हणाले

Bilawal Bhutto

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनीही अलीकडेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला घरचा आहेर दिला होता


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : Bilawal Bhutto दहशतवादामुळे भारताला आधीच खूप नुकसान सहन करावे लागले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा तणाव अधिकच वाढला आहे. दरम्यान, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचे एक विधान आले आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, पाकिस्तानचा स्वतःचा इतिहास आहे. यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले होते की पाकिस्तान ‘डर्टी वर्क’ करत आला आहे.Bilawal Bhutto



बिलावल भुट्टो यांनी नुकतेच स्काय न्यूजशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कबूल केले की पाकिस्तानने दहशतवादाला पोसले आहे. भुट्टो म्हणाले, “संरक्षणमंत्र्यांनी आतापर्यंत जे काही सांगितले आहे, ते (दहशतवाद) मला गुपित वाटत नाही. पाकिस्तानचा स्वतःचा भूतकाळ आहे. याचा परिणाम असा झाला की आपल्याला बरेच काही सहन करावे लागले. आपण स्वतः यातून धडा घेतला आहे. हे सुधारण्यासाठी आपल्याला एका प्रक्रियेतून जावे लागेल.”

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनीही अलीकडेच दहशतवादाच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले होते, “पाकिस्तानचा दहशतवादाला पोसण्याचा इतिहास आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याव्यतिरिक्त, पाकिस्तानने निधी देखील पुरवला आहे. आम्ही अनेक वर्षांपासून अमेरिकेसाठी हे घाणेरडे काम करत आहोत.

Now Bilawal Bhutto has admitted Pakistans crime

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात