Devendra Fadnavis : निधी वाटपात अजितदादांच्या “दादागिरीला” फडणवीसांचा चाप; मंत्र्यांची समिती नेमून ठेवणार “वॉच”!!

devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सरकार कोणत्याही आघाडीचे असो, अर्थमंत्री म्हणून अजितदादांचीच आतापर्यंत निधी वाटपात “दादागिरी” चालायची आता या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावलाय. निधी वाटपाच्या समितीचे अध्यक्ष पद त्यांनी अजित पवारांना दिले असले तरी प्रभावशाली मंत्र्यांची समिती नेमणूक त्यांच्यावर “वॉच” ठेवण्याची व्यवस्था फडणवीस यांनी केली आहे. (Devendra Fadnavis)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकार असताना काँग्रेसचा मुख्यमंत्री असला तरी राष्ट्रवादीच्या टेकूने ते सरकार टिकलेले असल्याने अजित पवारांची “दादागिरी” काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सहन करायला लागायची. निधी वाटपात ते राष्ट्रवादीला झुकते माप द्यायचे.



महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी अजित पवारांनी निधी वाटपात राष्ट्रवादीच्याच आमदारांना प्राधान्य दिले होते. तशा तक्रारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी केल्या होत्या. तरी देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले म्हणून शिवसेना फुटली. महायुतीचे सरकार पुन्हा आले.

पण माहिती सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी नंतर अजित पवार महायुतीत आले आणि अर्थमंत्री म्हणून पुन्हा त्यांनी “दादागिरी” सुरू केली होती. पण सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी त्यांना अटकाव केला. पण आता तर भाजप मोठ्या आमदार संख्येने सत्तेवर आल्यानंतर अजित पवारांच्या (Ajit Pawar)अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कात्री लावली. अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी ते तिसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत.Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या निधी वाटपाचे सूत्र ठरवून अजित पवारांकडे या समितीचे अध्यक्षपद दिले तर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, दादा भुसे, त्याचबरोबर भाजपचे वरिष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांना त्या समितीचे सदस्य नेमले. अजित पवार निधी वाटप करणार असले तरी मंत्र्यांची समिती आता त्यांच्यावर वॉच ठेवणार असून त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या दादागिरीला अशी कात्री लावली आहे.

Devendra Fadnavis clips Ajit Pawar’s wings

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात