पहलगाम हल्ल्याबाबतच्या माझ्या विधानाबद्दल मी माफी मागतो, असंही म्हणाले..
विशेष प्रतिनिधी
नागपूर : दहशतवादी धर्म विचारून मारत नाहीत, या वादग्रस्त विधानाबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले की, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, मी काल मी जे बोललो ते मोडूनतोडून दाखवले गेले. मी म्हणालो होतो की सहसा दहशतवाद्यांकडे हल्ला करण्यापूर्वी धर्म किंवा जात विचारण्यासाठी वेळ नसते, परंतु जीव घेण्यापूर्वी धर्म विचारण्याची ही पहिलीच घटना घडली आहे. मी एवढेच बोललो, त्यापेक्षा जास्त काही बोललो नाही. पण माझ्या विधानाचा विपर्यास करून ते सादर करण्यात आले. जर माझ्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा कोणी दुखावलं गेलं असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो.
ते पुढे म्हणाले, पहलगाम हल्ल्यातील गुप्तचर यंत्रणेचे अपयश लपविण्यासाठी माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. पहलगाम हल्ल्याबाबतच्या माझ्या विधानाबद्दल मी माफी मागतो.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला होता ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांनी माध्यमांसमोर दावा केला आहे की दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर हे हत्याकांड घडवले. मारण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांच्या धर्माबद्दल विचारले. जेव्हा शंका आली तेव्हा कलमा म्हणण्यास सांगण्यात आले आणि जेव्हा दहशतवाद्यांनी पर्यटक हिंदू असल्याची पुष्टी केली तेव्हा त्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार मारले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App