GEO News, SAMAA TV सह १६ पाकिस्तानी YouTube चॅनेलवर घातली बंदी
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार भारत सरकारने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. या चॅनेल्समध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही आणि जिओ न्यूज सारख्या मोठ्या नावांचाही समावेश आहे.
सरकारने हे पाऊल उचलले कारण हे चॅनेल भारत, भारती सैन्य आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध भडकाऊ, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवत होते. ही माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
भारताविरुद्ध प्रक्षोभक मजकूर पसरवल्याबद्दल आणि समाजात द्वेष पसरवल्याबद्दल पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल ब्लॉक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App