नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय हवामान तज्ज्ञ म्हणून गौरविलेले ज्येष्ठ नेते जुन्या खोट्या भांडवलावर अजून किती दिवस राजकीय पोट भरणार??, असा सवाल खरं म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला पडलाय. पण फक्त “विशिष्ट बुद्धीची” माध्यमे वैचारिक गुलामगिरीमुळे तो विचारायची हिंमत करत नाहीत. पण म्हणून त्या प्रश्नाचे महत्त्व आपण कमी करायचे काहीच कारण नाही. Pahalgam attack
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोनच नेत्यांना राजकीय हवामान तज्ज्ञ म्हणून गौरविले होते, त्यापैकी रामविलास पासवान आता हयात नाहीत, पण दुसरे राजकीय हवामान तज्ज्ञ महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणात मराठी माध्यमांच्या आधारे आपले स्थान टिकवून आहेत. याच राजकीय हवामान तज्ज्ञांनी पहलगाम हल्ल्यानंतर आपले जुनेच खोटे राजकीय भांडवल बाहेर काढले. पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या घातल्या. ते हिंदू आहेत की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या पॅंटी उतरवल्या. दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी हे सगळे सत्य कथन सगळ्या माध्यमांसमोर केले, पण महाराष्ट्रातल्या राजकीय हवामान तज्ज्ञांनी आपल्या जुन्याच राजकीय भांडवलाच्या आधार ते सत्य नाकारले. दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना गोळ्या घातल्या की नाही, त्यातले तथ्य आपल्याला माहिती नाही, असे वक्तव्य करून त्यांनी पत्रकार परिषदेत कानावर हात ठेवले. सासवड मधल्या जाहीर भाषणात देखील त्यांनी तीच भूमिका रेटून मांडली. Pahalgam attack
राजकीय हवामान तज्ज्ञांना आणि त्यांच्या इकोसिस्टीमला दहशतवाद्यांचा धर्म चर्चेत यायला नकोसा झाला म्हणून त्यांनी काश्मीर मधल्या मुस्लिमांनी पर्यटकांना कशी मदत केली, त्यांचा जीव कसा वाचविला, याच्या कहाण्या तिथल्या हत्याकांडापेक्षा जोरदार चालविल्या. हा सगळा प्रकार त्यांनी हिंदू हत्याकांडाचे सत्य लपविण्यासाठी केला. त्यांनी तथाकथित धर्मनिरपेक्षता सिद्ध केली.
तेरावा खोटा बॉम्बस्फोट
पण या राजकीय हवामान तज्ज्ञांचे असले धर्मनिरपेक्षतेचे खोटे ढोल बडवणे काही नवीन नाही. 1993 च्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी त्यांनीच मुख्यमंत्रीपदावर राहून खोटे नॅरेटिव्ह चालविले होते. हिंदू बहूल इलाक्यांमध्ये 12 बॉम्बस्फोट झालेले पाहून त्यांनीच तेरावा बॉम्बस्फोट मुद्दामू मुस्लिम इलाख्यात केला होता. वास्तविक तो बॉम्बस्फोट झालेला नसताना आपण हिंदू – मुस्लिम दरी टाळण्यासाठी खोटे बोललो, अशी टीमकी या राजकीय हवामान तज्ज्ञांनी तेव्हा जाहीरपणे वाजवली होती. त्यांनी तीच फुटकी टिमकी त्यांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा वाजवली. भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेलेल्या छगन भुजबळांनी देखील राजकीय हवामान तज्ज्ञांची री ओढली. राजकीय हवामान तज्ज्ञांना देशाच्या राजकारणाचा कसा अंदाज आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाशी लढताना, पाकिस्तानला धडा शिकवताना आपण हिंदू मुस्लिम ऐक्य दाखविले पाहिजे, याची जाणीव राजकीय हवामान तज्ज्ञांना आहे, असे समर्थन छगन भुजबळांनी केले.
अर्थात भुजबळ आज जरी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आले असले, तरी त्यांच्यावर राजकीय सत्तेचे संस्कार राजकीय हवामान तज्ज्ञांनीच केलेत. त्यामुळे ते तरी वेगळे काय बोलणार?? पण काही असले तरी आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या नद्यांमधून बरेच राजकीय पाणी वाहून गेले आहे. राजकीय हवामान तज्ज्ञांचे जुने खोटे राजकीय भांडवल नव्या वातावरणात चालेनासे झाले आहे, म्हणून तर त्यांनी धर्मनिरपेक्षतेचे नॅरेटिव्ह चालवायचा प्रयत्न केल्याबरोबरच ते सोशल सोशल मीडियात जोरदार ट्रोल झाले. सगळ्यांनी त्यांचे वाभाडे काढले. त्यांची वेगवेगळी मीम्स फिरवली. राजकीय हवामान तज्ज्ञांनी दडपायचा प्रयत्न केलेले सत्य तपास यंत्रणांनी समोर आणले. पहलगाम मध्ये धर्म विचारूनच हिंदूचे हत्याकांड झाले हे तथ्य तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशी आणि तपासात समोर आले. राजकीय हवामान तज्ज्ञांचे जुने धर्मनिरपेक्ष नॅरेटिव्हचे भांडवल खोटे पडले. पण ही सुरुवात आहे अजून बरेच दडपलेले सत्य बाहेर येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App