Chhatrapati Sambhajinagar : देशातील पहिली ‘इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी’ छत्रपती संभाजीनगर येथे सुरू

Chhatrapati Sambhajinagar

डीएमआयसी कॉरिडॉरमुळे (DMIC) येथील विकासाला गती मिळत आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे, ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर’ (सीएमआयए) तर्फे आयोजित पुरस्कार वितरण 2025 कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना त्यांनी सन्मानित केले व उपस्थितांशी संवाद साधला.Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरच्या भागात उद्योग क्षेत्राच्या विकासामध्ये सीएमआयए महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजकांशी 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जवळून संबंध आला. येथील उद्योजक अतिशय उद्यमशील आहेत. जेव्हाही उद्योगांच्या अनुषंगाने दौरा व्हायचा, तेव्हा सोबत सर्वाधिक उद्योजक हे छत्रपती संभाजीनगर येथीलच असायचे. येथील उद्योजकांमध्ये मोठी क्षमता आहे. येथील उद्योगांना आणि उद्योजकांना फक्त थोडे प्रोत्साहन देण्याची गरज असते.

तसेच येथील उद्योग क्षेत्राने एक चांगली इकोसिस्टिम याठिकाणी तयार केली असून त्याला राज्य सरकारच्या मिळालेल्या पाठबळामुळे, आज छत्रपती संभाजीनगर एक बिजनेस व इंड्रस्टी हब झालेले आपल्याला पहायला मिळत असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आज डीएमआयसी कॉरिडॉरमुळे (DMIC) येथील विकासाला गती मिळत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीएमआयसी प्रकल्पाला गती दिली. देशात अनेक ठिकाणी या कॉरिडॉरचे काम सुरु असून, सर्वात आधी ‘इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी’ आपण याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे सुरु केली. उद्योग क्षेत्राला गरजेच्या सर्व सुविधांना जोडणारा सेतू यामुळे निर्माण झाला. राज्यातील मागास भागात जास्तीत जास्त उद्योग यावेत, असा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. आज राज्यात येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील पायाभूत सुविधांमुळे पसंतीचे ठिकाण बनत असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या भागात जमिनीच्या वाढत्या मागणीमुळे उद्योगांसाठी आणखी 8,000 एकर जमिनीचे अधिग्रहण राज्य सरकार करणार आहे. यावेळी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात मांडलेल्या मागण्या ज्यामध्ये इंडस्ट्रियल रिंग रोड, आंतरराष्ट्रीय स्तराचे प्रदर्शन केंद्र आणि सभागृह, ईव्ही वाहनांसाठीच्या स्किल सेंटरसाठीची जागा, शहरातील वाहतुकीच्या अनुषंगाने उड्डाणपूल तसेच फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

तसेच मराठवाड्यात दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाच्या सुरु असलेल्या विकासकामांचा तसेच शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर यासारख्या महत्त्वपूर्ण पायाभूत विकास प्रकल्पांचाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत आढावा घेतला. याप्रसंगी मंत्री अतुल सावे, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष, उद्योजक, पदाधिकारी, सदस्य व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

The country’s first Integrated Smart Industrial City launched at Chhatrapati Sambhajinagar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात