वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Gilgit-Baltistan पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात दहशतीचे वातावरण आहे. भारतीय लष्करी हल्ल्याची शक्यता असल्याने पाकिस्तानी सैन्यात गोंधळ माजला आहे. लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या पंजाब प्रांतातील मुरीदके व बहावलपूर येथील ठिकाणांवर हल्ल्याची भीती आहे. या ठिकाणांवरील मशीद आणि मदरसे आता रिकामे झाले आहेत.Gilgit-Baltistan
मुरीदके येथील तोयबाच्या मदरशांमध्ये शिकणारे सुमारे २००० विद्यार्थी आणि मौलवी-मौलाना येथेून निघून गेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुरीदकेमध्ये आता फक्त ५० ते ७५ तोयबाचे दहशतवादी कॉम्प्लेक्सच्या सुरक्षेसाठी आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर हाफिज सईदने मुरीदके सोडले आहे.बहावलपूर येथील जैशच्या ठिकाणावरूनही सुमारे एक हजार विद्यार्थी मदरशातून निघून गेले आहेत. बहावलपूर येथील
सैनिकांच्या सुट्या रद्द, सर्वांना परतण्याचे आदेश
पाकिस्तानी सैन्याने सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करून मुख्यालयात परतण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराबरोबरच हवाई दल आणि नौदललाही असेच आदेश जारी केले आहेत. कँट एरियामध्ये सध्या खूप हालचाल दिसत आहे. अतिरिक्त रसद सामग्रीने भरलेले ट्रकही तेथे येत आहेत. सूत्रांनुसार पाक लष्कर युद्धाच्या समान तयारीत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, करगिल युद्धानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी सेना या स्तरावर बचावाच्या तयारीत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय १४ अतिरेक्यांची यादी जारी
सुरक्षा संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय १४ स्थानिक अतिरेक्यांची यादी शनिवारी जारी केली. या यादीत समाविष्ट सर्व अतिरेकी २० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. हे सर्व लष्कर-ए-तोएबा, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहंमद अतिरेकी संघटनांशी संबंधित आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App