अहमदाबाद मध्ये पोलिसांची तडाखेबंद ॲक्शन; पकडले 550 बांगलादेशी घुसखोर!!

Post Pahalgam terror attack

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः सगळ्या मुख्यमंत्र्यांना फोन करून आपापल्या राज्यातले पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक शोधून काढून त्यांना त्यांच्या देशात पाठवायच्या सूचना केल्या. त्यापाठोपाठ अहमदाबाद पोलीस ॲक्शन मध्ये आले. त्यांनी 48 तासांमध्ये अहमदाबाद मधले तब्बल 550 बांगलादेशी घुसखोर पकडून त्यांच्या हकालपट्टीची कायदेशीर तयारी चालवली.

अहमदाबाद मधल्या चंडोल भागात बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कुठले 70 बांगलादेशी घुसखोर पकडून त्यांना आधीच त्यांच्या देशात रवाना केले होते. या घुसखोरांकडून पोलिसांनी बरीच माहिती गोळा केली होती. त्या माहितीच्या आधारे अहमदाबाद पोलिसांनी कालपासून कारवाई सुरू करून 48 तासांमध्ये 550 बांगलादेशी घुसखोर पकडले आणि त्यांच्या कायदेशीर हकालपट्टीची तयारी चालवली. यासंदर्भात पोलीस आयुक्त शरद सिंघल यांनी माहिती दिली.

बांगलादेशी घुसखोरांनी स्थानिक ऑपरेटर्सच्या मदतीने खोटी आयडेंटिटी कार्ड बनवली. आधार कार्ड बनवून घेतले. पण त्यांच्याकडे अनेक कागदपत्रे आढळली नाहीत. त्या आधारे त्यांची ओळख पटविण्यात आली. त्यानंतरच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कायदेशीर हकालपट्टीची कारवाई सुरू करण्यात आली, असे शरद सिंघल यांनी स्पष्ट केले.

Post Pahalgam terror attack, HUGE crackdown on alleged illegal immigrants in Gujarat

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात