वृत्तसंस्था
बंगळुरू : K. Kasturirangan भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. कस्तुरीरंगन यांनी बेंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.K. Kasturirangan
२७ एप्रिल रोजी त्यांचे पार्थिव रमण संशोधन संस्थेत (आरआरआय) जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल. कस्तुरीरंगन यांना दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजारी होते.
कस्तुरीरंगन हे १९९४ ते २००३ पर्यंत इस्रोचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली इस्रोने चांद्रयानासारख्या मोठ्या मोहिमांची योजना आखण्यास सुरुवात केली. ते नवीन शिक्षण धोरणाच्या (एनईपी) मसुदा समितीचे अध्यक्षही होते.
कस्तुरीरंगन यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. ते २००३ ते २००९ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी तत्कालीन भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले होते.
कस्तुरीरंगन हे एप्रिल २००४ ते २००९ पर्यंत बेंगळुरूस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजचे संचालक होते. त्यांनी केंद्राच्या अनेक समित्यांचे नेतृत्व केले किंवा त्यांचा भाग होते. त्यांनी उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यावरण यासह विविध मुद्द्यांवर सरकारला सल्ला दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App