Devendra fadnavis : ठाकरे + पवारांच्या कौटुंबिक ऐक्यावर माध्यमांचीच पतंगबाजी; फडणवीसांनी वरच्या वर त्यांची कन्नी कापून टाकली!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पहलगाम हल्ला होण्याआधी मराठी माध्यमांच्या बातम्यांना ठाकरे पवारांच्या कौटुंबिक परीक्षेने व्यापून टाकले होते दोन्ही बड्या घराण्यांच्या ऐक्याची माध्यमांनीच जोरदार पतंगबाजी केली होती पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरच्यावरच त्यांची त्यांनी आज कापून टाकली.

एनडीटीव्हीच्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंब एक झाले, तर आमची काही हरकत असायचे कारणच नाही. पण ते सध्या एकत्र येतील अशी कुठलीही परिस्थितीत दिसत नाही, असे सांगून माध्यमांच्या पतंगबाजीला कात्री लावली.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना साद – प्रतिसाद देऊन ते परदेश दौऱ्यावर निघून गेले. शरद पवार आणि अजित पवार हे त्यांच्या संस्थाच्या बैठकांमध्ये एकत्र आले. पण त्यावरून माध्यमांनी फार मोठमोठे अर्थ काढत ठाकरे बंधू एकत्र येणार, पवार काका + पुतणे एकत्र येणार. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडणार, अशा बातम्यांची भरमार केली. मात्र या बातम्यांच्या पतंगांची कन्नी फडणवीस यांनी कापून टाकली.

या मुद्द्यावर फडणवीसांना एनडीटीव्ही च्या मुलाखतीत प्रश्न विचारल्यावर फडणवीस म्हणाले :

  • दोन्ही परिवार एकत्र येत असतील तर आम्ही स्वागतच करू. त्यात आमची काही अडचण व्हायचे काही कारण नाही. पण ते राजकीय दृष्ट्या एक होतील ही शक्यता आज दिसत नाही.
  • माध्यमे फार जास्त ऐकतात. फार जास्त अर्थ काढतात. फार जास्त संदर्भ लावतात. पण कुठल्याही री अलाइनमेंटची परिस्थिती आज मला दिसत नाही. साद प्रतिसाद याबद्दल मला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारलेले बरे.
  • पण माध्यमांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की 2019 पासून त्यांनी जे अंदाज लावले, जे अर्थ काढले तसे काही घडले नाही. हा तरी अनुभव त्यांनी लक्षात घेतला पाहिजे.

Devendra fadnavis rejected possibility of political realignment of Thackerays and pawars

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात