मुंबई येथे महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन प्रशासकीय परिषदेची दुसरी बैठक पार पडली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : World Bank मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) प्रशासकीय परिषदे’ची दुसरी बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण व नवीन साठवण तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.World Bank
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होण्यासाठी आवश्यक धोरणे तयार करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष सादरीकरण करण्यात आले. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाला सादर करावयाच्या प्राथमिक प्रकल्प अहवाल मानक कार्य प्रणालीलाही (एसओपी) यावेळी मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एसओपीप्रमाणे सादरीकरण करणे आणि राज्याचे सकल उत्पन्न (जीडीपी) 14.5 टक्के करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्टेट डेटा पॉलिसीच्या माध्यमातून आवश्यक साधनसामग्री तयार करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
यानंतर शासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘मित्र’ संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, युनिर्व्हसल ‘ए आय’ विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यासाठी आयआयटी मुंबई आणि ओआरजीपीडिया यांच्याशीही याप्रसंगी करार करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App