वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Pakistani airspace पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पाऊल उचलले आहे. यात सर्वात मोठे पाऊल अटारी-वाघा सीमा तात्पुरती बंद केली आहे. ही सीमा दोन्ही देशांत रोज सायंकाळी होणाऱ्या रिट्रीट समारंभ आणि मर्यादित व्यापारासाठी महत्त्वाची मानली जाते. सरकारकडून सांगितले की, जोवर स्थिती सामान्य होत नाही, तोवर अटारी सीमेवर भारतीय गेट उघडले जाणार नाही. यासोबत दररोज सूर्यास्ताला होणारा ध्वजारोहण कार्यक्रम आता भारतीय व पाकिस्तानी सैनिकांतील हस्तांदोलन प्रक्रियाही बंद केली आहे.Pakistani airspace
पाक एअरस्पेस बंद: एअर इंडिया, इंडिगोनुसार, अमेरिका अन् युरोपच्या उड्डाणांवर परिणाम शक्य
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. एअर इंडिया आणि इंडिगोने प्रवाशांना सूचित केले आहे की उड्डाण मार्ग बदलल्यामुळे काही आंतरराष्ट्रीय उड्डाण कार्यक्रम प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे पर्यायी विस्तारित मार्गाने जाऊ शकतात. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी उड्डाणाच्या वेळेची पुन्हा तपासणी करावी. एअर इंडियाने सांगितले की अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्वेकडील काही उड्डाणे प्रभावित होऊ शकतात.
भारताने पाकला सिंधू जल करार स्थगितीचे पत्र पाठवले: भारतीय केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने पाकिस्तानला सिंधू जल करार स्थगित करण्याची औपचारिक सूचना दिली आहे. पत्रात म्हटले आहे की पाकिस्तान सतत सीमा पारून दहशतवादाला आश्रय देत आहे, त्यामुळे करार कायम ठेवता येणार नाही. भारताने स्पष्ट केले आहे की ज्या पाकिस्तानी हिंदूंना लाँग टर्म व्हिसा जारी झाले आहेत, ते व्हिसा वैध राहतील.
मॅक्रॉन, नेतन्याहू, मेलोनी यांची पीएम मोदींशी चर्चा : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल-सिसी आणि जॉर्डनचे राजा अब्दुल्ला द्वितीय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
मुंबई|दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या पर्यटनावर संकट घोंगावण्यास सुरुवात झाली. लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणानुसार, १० पैकी ६ कुटुंबे २०२५ साठी काश्मीर प्रवासाचे प्लॅनिंग आणि बुकिंग रद्द करतील. सर्व्हेत सहभागी १० पैकी ३ प्रवासी पुढील ३ वर्षे कधीही काश्मीरचा प्रवास करू शकतात. दुसरीकडे, १० पैकी ३ अन्य लोक स्थितीचा सामना करण्यासाठी सरकारच्या पद्धतीच्या आधारावर आपले काश्मीरला जाण्याचे नियोजन करतील. सर्वेक्षणात देशातील ३६१ हून जास्त जिल्ह्यात राहणाऱ्या प्रवाशांपैकी २१,००० हून जास्त प्रतिक्रिया आल्या आहेत.
श्रीनगर|पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील अनेक भागांत काश्मिरी विद्यार्थ्यांना छळ आणि हल्ल्याचा सामना करावा लागला. जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघाने आरोप केला की, देशातील विविध भागांत काश्मिरी विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे. डेहराडूनमध्ये हिंदू रक्षा दलाद्वारे जारी व्हिडिओनंतर विद्यार्थ्यांना धमक्या मिळत आहेत. नासीर खुहमीने सांगितले की, विद्यार्थ्यांना डेहराडून सोडण्याचा इशारा दिला आहे. चंदीगडच्या डेराबस्सीत काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. त्यात एका विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली.नोएडाच्या एमिटी युनिव्हर्सिटीतही एका काश्मिरी विद्यार्थ्याला मारहाणकेली. डेहराडूनच्या अनेक महाविद्यालयांना काश्मिरी विद्यार्थ्यांना बडतर्फ करण्याची धमकी मिळाली आहे. जम्मू-काश्मीरचे सीएम ओमर अब्दुल्ला म्हणाले, आम्ही राज्य सरकारांच्या संपर्कात आहोत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App