दहशतवाद्यांचा निषेध करत बीएसएफचा मोठा निर्णय; अटारी, हुसेनिवाला आणि सद्की येथील ‘रेट्रीट सेरेमनी’तील हस्तांदोलन बंद

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी हिंदू पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सीमेवर दररोज पार पडणाऱ्या रिट्रीट सेरेमनीतील हस्तांदोलन बंद करण्याचा निर्णय सीमा सुरक्षा दलाने (BSF) घेतला आहे. हा समारंभ अटारी, हुसेनीवाला आणि सद्की या ठिकाणी दररोज पार पडतो.

बीएसएफच्या पंजाब फ्रंटियरने २४ एप्रिल रोजी ‘X’ (ट्विटर) वरून याबाबत माहिती दिली. यामध्ये म्हटले आहे की, या समारंभात भारतीय आणि पाकिस्तानी गार्ड कमांडर यांच्यातील प्रतिकात्मक हस्तांदोलन बंद करण्यात येणार आहे आणि समारंभादरम्यान सीमेवरील दरवाजे बंद ठेवण्यात येणार आहेत. हा निर्णय भारताच्या सुरक्षेबाबतची चिंता आणि सीमापार सुरू असलेल्या उकसवणुकीविरुद्धचा निषेध दर्शवतो. “शांती आणि चिथावणी एकत्र नांदू शकत नाहीत,” असा ठाम संदेश बीएसएफने दिला आहे.



‘बीटिंग रिट्रीट’ म्हणून ओळखला जाणारा हा समारंभ सीमेवर हजारो पर्यटकांना आकर्षित करतो. मात्र, पहलगाम हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले आणि यामागे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांचा हात असल्याचे समोर आल्यानंतर भारताने अशा प्रतिकात्मक सौहार्दाला थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने (CCS) घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांत या बदलाचा समावेश आहे. CCS ने अटारीवरील लँड ट्रान्झिट पोर्ट तात्काळ बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय भारताने सिंधू जल करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला असून, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आली आहे. सध्या दिलेले व्हिसा देखील २७ एप्रिलपासून रद्द करण्यात येणार आहेत आणि भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या व्हिसा संपण्यापूर्वी भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

Attari, Hussaini Wala and Sadki on BSF decides to stop handshakes during retreat ceremonies

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात